धार्मिक

नेप्तीत रमजान ईद उत्साहात साजरी. हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन .

अहमदनगर- नगर तालुक्यातील नेप्ती येथे मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरी केली. शुक्रवारी चंद्रदर्शनाची साक्ष मिळाल्याने शनिवारी रमजान ईद उत्सव साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला होता .त्यानुसार त्यांनी जोरात तयारी चालू केली होती. सकाळी साडेनऊ वाजता शाही दमडी मशिद येथे गावातील वाड्या वस्तीवरील मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.मौलाना मुनीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करून देशांमध्ये शांतता ,समृद्धी व धार्मिक ऐक्यासाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली .मुस्लिम बांधवांना गावातील हिंदू बांधवांनी रमजान ईदच्या शुभेच्छा देत एकमेकांना आलिंगन दिले यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत होते .मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन ग्रामस्थांनी शिरखुम्याचा आस्वाद घेतला. यावेळी माजी. उपसरपंच फारुक सय्यद, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले, माजी सरपंच सुधाकर कदम ,जालिंदर शिंदे, गुलाब सय्यद, आयुब सय्यद, सत्तार सय्यद ,बाबूलाल सय्यद, बादशाह सय्यद, उमर सय्यद, जावेद सय्यद, कयूम सय्यद, नौशाद शेख, सिकंदर शेख, हुसेन सय्यद, युनूस सय्यद ,मुक्तार सय्यद वाजिद सय्यद, प्रा. भाऊसाहेब पुंड सुरेश कदम , सलीम सय्यद ,जमीर सय्यद ,रफिक सय्यद ,उस्मान शेख, असिफ शेख , आसिफ सय्यद ,अरबाज शेख ,अन्सार सय्यद यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव व नाले हैदर यंग पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमजान ईद शांतते पार पाडावी यासाठी पी .एस.आय . रणजीत मारग, पोलीस कॉन्स्टेबल विशाल टकले, पोलीस पाटील अरुण होले महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button