अहमदनगर

आपण जनतेचे सेवक असल्याचे भान तहसीलदार आवळकंठेंना नाही – पवळे



तहसीलदारांनी पेरू वाटप आंदोलन मोडून काढले

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी


शिव पाणंद शेतरस्त्यांच्या शासन निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे अनिवार्य असुन शेतकर्‍यांकडून सप्तपदी अभियानांतर्गत गोळा केलेल्या अर्जांवर काम होत नसल्यामुळे कायदा हातात घेता येत नाही त्यामुळे आपला मनस्ताप व्यक्त करण्यासाठी पारनेर तहसीलवर सुरु केलेले पेरू वाटत आंदोलन मोडून काढत पेरू फेकून दिले

तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी आंदोलक शेतकऱ्यांचे पेरू फेकून देवून ज्या पद्धतीने अर्वाच्य भाषेचा वापर केला तो पदाला शोभणारा नसुन त्यामुळे त्यांना पिढ्यान पिढ्या शेतरस्त्यांसाठी संघर्ष करणारा शेतकरी क्षमा करणार नाही त्यांच्याकडून ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळ्न्याचा प्रयोग झाला तो वरिष्ठ अधिकार्‍यांसह, लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने घेवून आपण जनतेचे सेवक आहोत याची जाणीव करून द्यायला हवी- असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी सांगितले
जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या तालुक्यात शिवपाणंद शेत रस्त्यांसह पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करत विविध आंदोलनाच्या माध्यमातुन जनजागृती केली राज्यात शिवपाणंद रस्त्यांसह, पाझर तलावांच्या शासन निर्णयात मोठे बदल करण्यात आले व अनेक तालुक्यांमध्ये शेतरस्ते खुले दिसत आहे नगर जिल्हयात सप्तपदी अभियान जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडून राबवण्यात आले त्यात पारनेर तालुक्यातून शेतरस्त्यांसाठी सर्वात जास्त अर्ज करण्यात आले यासाठी आम्ही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला मोठे सहकार्य केले परंतु रस्त्याच्या कामांना मात्र केराची टोपली मिळाली त्यामुळे पारनेर तहसीलला पेरु वाटप अांदोलनाचे निवेदन देण्यात आले. निवेदनाची तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दखल घेतली नाही त्यामुळे शेतरस्ते पिडीत शेतकऱ्यांनी पेरू वाटप आंदोलन सुरू केले असता तहसीलदारांनी आंदलनाचे ठिकाणी येऊन अर्वाच्य भाषेचा वापर करत आपल्या मर्यादेचे उल्लंघन करत कर्मचाऱ्यांना ओरडत बॅनर फाडत शेतकर्यांचे पेरू फेकून दिले व आंदोलन मोडून काढले हा संविधानाचा अपमान असुन अधिकारीन लोकशाहीचा घात करत असतील तर पोलिसांनी यांच्यावर कारवाई करायला हवी लवकरच यांची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी सांगितले.यावेळी दशरथ वाळूंज, बाळासाहेब दळवी, रामदास लोणकर, बाळसाहेब औटी, विठ्ठल लोणकर, बाळासाहेब जाधव, हौशिराम कुदळे, प्रशांत खैरे, शंकर खैरे ,संपत जाधव, गणेश कुदळे आदींसह मोठ्या संख्येने शेतरस्ते पिडीत शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button