पारनेर तहसीलवर घडलेला प्रकार निंदनीय- हजारे

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील शिव पाणंद शेतरस्ते व पाझर तलाव यांच्या दुरुस्तीसह सप्तपदी अभियानातील अर्जांना केराची टोपली दाखवून फसवे अभियान राबवणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी यासाठी पारनेर तालुक्यातील शेतरस्ते पिडीत शेतकऱ्यांच्या पेरू वाटप आंदोलनावेळी तहसीलदार आवळकंठे यांनी गुंडगिरीची भाषा वापरली, शेतकऱ्यांची केलेली अवहेलना यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांची भेट घेतली तहसीलदारांच्या आर्वाच्च भाषाशैलीचा विडीओ दाखवत आंदोलन कर्त्यांना केलेल्या दमदाटीची सविस्तर माहिती दिली.
पारनेर तालुका हा विस्ताराने मोठा असुन आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टी ने तालुक्यात अनेक शिवपाणंद शेतरस्ते, पाझर तलावांसह पुरातन जलस्त्रोत निर्माण केलेले आहेत परंतु आज दिवसेंदिवस शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी व पाण्याचा वाढता तुटवडा यामुळे शेतक-यांची होणारी हानी भरून काढण्यासाठी गेल्या चार पाच वर्षांपासून शासण दरबारी विविध पत्रव्यवहार,आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला यामुळे पारनेर तालुक्यात मोठी चळवळ उभी राहीली याची दखल राहीली त्याचबरोबर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सप्तपदी अभियानांतर्गत शिवपाणंद शेतरस्ते खुले करण्याचे अावाहन केले याला सकारात्मक घेत शेतकर्यांनी पुढाकार घेत मोठा विश्वास दाखवत आपला अनमोल वेळ देत जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त अर्ज देण्यात आले परंतु शेतकऱ्यांना मात्र तहसीलवर खेट्या घालायचेच फक्त काम झाले यामुळे अखेर शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने पारनेर तहसीलवर आपला संताप व्यक्त करण्यासाठी पेरु वाटप आंदोलन निवेदन देवून सुरु केले असता तहसीलदार आवळकंठे यांनी अरेरावी करत गुंडासारखी भाषा वापरत तहसील कर्मचाऱ्यांना मोठ्या मोठ्याने ओरडत आंदोलन कर्त्यांचे पेरू तहसीलबाहेर फेकून द्यायला लावले व आंदोलन कर्त्यांचे बॅनर फाडले.आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी तहसीलदारांनी चढवलेला उद्धटपणाचा आवाज, आंदोलकांना दिलेली हिन वागणूक यासंदर्भात जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांना शरद पवळे यांनी घडलेला वृत्तांत सांगितला त्यावेळी आदरणीय आण्णांनी एकजुट होवून लढा उभारण्याचे अवाहन केले याला गांभिर्याने घेत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी पुढची दिशा ठरणार असल्याचे माध्यमांना सांगितले.