श्री क्षेत्र काकनेवाडी(श्रीरामनगर) येथून दिंडीचे प्रस्थान

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
आद्य जगद्गुरू श्रीमद शंकराचार्य जयंती व अखंड हरिनाम सप्ताहच्या निमित्ताने श्री क्षेत्र काकनेवाडी ते संत पंढरी पिंपळगाव वाघा येथे दिंडीचे प्रस्थान झाले.
या वेळी गावातील ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
हभप.श्रीकृष्णकृपांकित डॉ.विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संत पंढरी येथे विविध मंदिरे निर्माण होत आहेत. त्याच बरोबर गुरुकुल ध्यानमंदिर, संत निवास असे अनेक निर्धारित प्रकल्प येथे आकार घेत आहेत.
यावेळी दिंडीमधील वारकऱ्यांसाठी भगवान शेट वाळुंज यांच्याकडून महाप्रसाद, तर ठिकठिकाणी स्थानिक ग्रामस्थांकडून अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी दिंडी मध्ये अनेक वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये हभप. दिंडीचे मार्गदर्शक बाळासाहेब महाराज वाळुंज,सदस्य सचिन वाळुंज विनेकरी शिवाजी महाराज वाळुंज, हभप दादाभाऊ महाराज वाळुंज, रामदास महाराज वाळुंज, कारभारी वाळुंज, किसन महाराज, पोपट वाळुंज, नामदेव वाळुंज, राजुशेठ झावरे, अशोक वाळुंज (इंजि) अशोक वाळुंज, विजय वाळुंज(गुरुजी),गुलाबराव वाळुंज (सर),संतोष वाळुंज, बाबासाहेब रघुनाथ वाळुंज,गंगाराम वाळुंज सहभागी झाले होते.
दुस-या वर्षात पदार्पण करत असलेल्या या दिंडी सोहळ्यात जवळपास 100 भाविक सहभागी झाले होते. या पुढील काळातही असाच प्रतिसाद राहील अशी माहिती हभप रंगनाथ महाराज वाळुंज यांनी दिली.