रंधा येथील श्री. घोरपडा देवी मंदीर आर्थिक गैरकामकाजाची चौकशी करा- विजय पवार यांचा उपोषणाचा इशारा

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील रंधा येथील श्री. घोरपडा देवी मंदीर ट्रस्ट मधील आर्थिक गैरकामकाजाची चौकशी करण्यासाठी रिपब्लिकन चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय रमेश पवार यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे
,श्री.घोरपडा देवी मंदीर देवस्थान
ट्रस्टचे गलथान कारभाराची चौकशी करण्यात यावी व सबंधीतांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केलीं आहे
दि.२१/०२/२०२४ रोजी आपण तहसिल कार्यालय अकोले येथे सकाळी १०.०० वा. पासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिले आहे .
अनेक वर्षांपासून देवस्थान चे कामकाजाचे लेखा परिक्षण केले नाही,व राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडले नाही.
या मंदिरातील दानपेटी फोडून अनेक वेळा काही व्यक्तींनी भाविकांच्या दानावर डल्ला मारला आहे
दानपेटी फोडून दानाची चोरी केलेल्या व्यक्तींवर राजूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट आहेत
सदरची ट्रस्ट च्या विश्वस्त संस्थेएवजी अन्य अनाधिकृत व्यक्ती मार्फत या ठिकाणी पैसे गोळा केली जात आहे ट्रस्टचे वार्षीक उत्पन्ना चा कागदोपत्री हिशोब ठेवलेला नाही

या मंदीरात दि.०५/१०/२०२३ रोजी मंदीराची दानपेटी फोडून दोन गोण्या रक्कम
अन्य इसमाने चोरून नेलेली आहे. या रकमेचा हिशोब मिळावा.ट्रस्टचे नावाखाली अन्य लोक मनमानी कारभार करत आहे
मंदीराला पुजारी नाही. येथे पुजा आरती केली जात नाही. या मंदीराचे पाहणारे व्यक्तीवर दान पेटी फोडल्याचा गुन्हा दाखल झालेला असुन त्यांचे कडेस मंदीराच्या चाव्या कोणी व कसे ठेवलेलल्या आहेत .
देवस्थान परिसरातील भक्तनिवास व पार्कींग ठेका व्यवहार वर्तमानपत्रात प्रसिद्ध न करता परस्पर देण्यात आला सदर रक्कम तसेच सन २००४ पासुन देवस्थान च्या रकमेचा हिशोब देवस्थान मार्फत
जनतेसमोर जाहीर करावा अशीं मागणी करत श्री विजय रमेश पवार यांनी दि 21 मार्च पासून उपोषणाचा इशारा दिला आहे
निवेदनाच्या प्रति त्यांनी मा.धर्मादाय आयुक्त अहमदनगर ना. श्री. रामदास आठवले (केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री ) पोलिस निरिक्षक राजुर, उपविभागिय पोलिस अधिकारी संगमनेर ,अप्पर पोलिस अधिक्षक श्रीरामपूर, तहसिलदार अकोले, आदींना पाठविल्या आहेत