अजित पवार मुख्यमंत्री होणारच.. NCP नेत्याचं हे मोठं विधान

दत्ता ठुबे
🔹अजित पवारांसारखा अभ्यासू माणूस राजकारणात नाही. त्यामुळं अजित पवार मुख्यमंत्री होणारच. हे अमित शहा यांनी देखील मान्य केलं असल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली असताना राष्ट्रवादीच्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवारांसारखा अभ्यासू माणूस राजकारणात नाही. त्यामुळं अजित पवार मुख्यमंत्री होणारच. हे अमित शहा यांनी देखील मान्य केलं असून त्यांच्या महाराष्ट्र वाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणारच.. वेट अँड वॉच, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ते बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मिटकरी म्हणाले की,राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की, पक्षाचा नेता मुख्यमंत्री बनावा.जसं हे राज्य व्हावं,हीतर श्रींची इच्छा, असे इतिहासामध्ये आम्ही वाक्य ऐकले, बखरीमध्ये वाचले. तत्कालीन रयतेला तसं वाटलं होतं.आता तो काळ नाही राहिला, पण आता लोकशाहीमध्ये प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू व्यक्तीमत्व असणारा एखादा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असावा. ही भूमिका अन् भावना प्रत्येकाची आहे, माझी सुद्धा भावना कार्यकर्ता म्हणून अशीच आहे, असंही यावेळी मिटकरी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, की त्यामुळे धाराशिवमध्ये लागलेले बॅनर, नागपूर मध्ये लागलेले बॅनरवरून देवेंद्र फडणवीस यांनी देखील ते मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेतृत्व अजित पवार आहेत. भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व अजित पवार करतील याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आणि ते करावं’. त्यांच्या सारखा नेतामहाराष्ट्राचा राजकारण सापडणार नाही. हे अमित शहा यांनीही मान्य केले आहे,असा गौफ्यस्फोट देखील यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येईल, असा विश्वास आणि मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.