
बौध्द विहारे ही ज्ञान व संस्काराची केंद्रे झाली पाहिजे
– कृषी अधिकारी बाळासाहेब देठे
अकोले प्रतिनिधी
पाडाळणे (ता अकोले )येथे बौध्द जयंती निमित्ताने अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू, करण्यात आले आज पाडाळणे गावात बौध्द बांधवांनी बौध्द जयंती मोठया थाटामाटात साजरी केली त्यानिमित्ताने सकाळी दहा वाजता बौध्द विहारात धार्मिक विधी भीमसेन देठे यांनी पार पाडला, धम्म देसना देण्यात आली यानिमित्ताने कृषी अधिकारी व बौध्द धर्म आणि आंबेडकर विचारधारेचे अभ्यासक बाळासाहेब देठे यांनी बौध्द धर्माचे आपल्या जीवनात काय महत्व आहे आणि डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार करून जात संपुष्टात कशी आणली याबाबतीत सखोल माहिती दिली आजच्या घडीला जिथे धर्मा धर्मात तेढ निर्माण होत आहे अशा वेळी बुध्द धर्माचे आचरण करून प्रेम आणि करुणेने दवेषावर मात करण्यासाठी बौध्द धर्म किती आवश्यक आहे हे सांगितले, बौध्द विहारे ही शोभेची वास्तु न होता ती ज्ञानाची संस्काराची केंद्रे झाली पाहिजेत म्हणुन त्यात ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरु झाली पाहिजे म्हणून बाळासाहेब देठे यांनी रूपये पाच हजाराची पुस्तके विहारास दान करून वाचनालय सुरु केले सर्वानी या सुविधेचा लाभ करुन घेण्यासाठी वापर करावा असे आवाहन त्यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्म का स्विकार केला याविषयी त्यांनी सखोल माहिती दिली असा हा आगळावेगळा प्रयोग प्रत्येक बौध्द विहारात झाला पाहिजे जेणेकरून विहारांचा ऊपयोग खऱ्या अर्थाने लोक कल्याणासाठी होईल याप्रसंगी डॉ आनंद देठे, शिक्षिका सुरेखा देठे, भीमसेन देठे, सुरेश देठे आणि निवृत्ती देठे यांनी आपले विचार व्यक्त केले, बुध्द जयंती साठी नितिन देठे, राहुल देठे, गौतम देठे ,रविंद्र देठे, बाळासाहेब देठे, भीमसेन देठे, डॉ आनंद देठे आणि महिलांनी विशेष लक्ष घालुन जयंती उत्साहात साजरी झाली