इतर

आजचे पंचांग व राशीभविष्य दि 12/08/2024

: 🙏🙏 सुप्रभा


🍁🍁 आजचे पंचांग

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २१ शके १९४६
दिनांक :- १२/०८/२०२४,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:११,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५७,
शक :- १९४६राशी
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- सप्तमी समाप्ति ०७:५६,(अष्टमी),
नक्षत्र :- स्वाती समाप्ति ०८:३३,
योग :- शुक्ल समाप्ति १६:२५,
करण :- विष्टि समाप्ति २०:५४,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ०८प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:४७ ते ०९:२३ पर्यंत,

लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:११ ते ०७:४७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:४५ ते ०५:२१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:२१ ते ०६:५७ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
शिवमुष्टि(तीळ), भद्रा ०७:५६ नं. २०:४९ प., यमघंट ०८:३३ नं., अष्टमी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २१ शके १९४६
दिनांक = १२/०८/२०२४
वार = इंदुवासरे(सोमवार)

मेष
चांगली बातमी समजेल. खेळ व मनोरंजन यात वेळ निघून जाईल. कटू प्रसंगाचे रूपांतर गोडव्यात कराल. अति विचार करत राहू नये. जोडीदाराचे सहकार्य अपेक्षित राहील.

वृषभ
जोडीदार तुमच्यावर खुश राहील. जवळच्या प्रवासाची संधी मिळेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. सामाजिक बांधीलकी विसरून चालणार नाही. भावंडांसोबत अनमोल क्षण घालवाल.

मिथुन
चालत आलेली संधी ओळखा. जोडीदाराकडून आश्चर्यचकित केले जाईल. कामातून समाधान मिळेल. मित्रांचा रोष गोडीने कमी करावा. मन प्रसन्न राहील.

कर्क
मुलांसाठी चांगला काळ आहे. नवीन नोकरी शोधात असणार्‍यांना यश येईल. आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल. हातात नवीन अधिकार येतील. मुलांच्या जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल.

सिंह
आत्मविश्वासाने निर्णय घ्या. नोकरीमध्ये चांगला काळ असेल. आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. व्यापार्‍यांच्या प्रयत्नाला यश येईल. विरोधक नामोहरम होतील.

कन्या
प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. मेहनत, आणि प्रयत्न यांची कास सोडू नये.

तूळ
बोलण्यातून इतरांची माने जिंकाल. संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. झोपेची तक्रार जाणवेल.

वृश्चिक
आजचा दिवस मनासारखा जाईल. जुनी येणी वसूल होतील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. एखादी जुनी समस्या संपुष्टात येईल.

धनू
मनातील नसत्या शंका काढून टाकाव्यात. खर्चावर नियंत्रण ठेवा. विरोधक परास्त होतील. कार्यालयात प्रशंसेस पात्र व्हाल. क्रोधवृत्तीत वाढ होईल.

मकर
जुनी खोळंबलेली कामे मार्गी लागतील. इतरांच्या विश्वासाला खरे उतरा. आर्थिक पातळीवर यशकारक दिवस. मिळकतीच्या बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कुंभ
नोकरी-व्यवसायात सन्मान मिळेल. दिवस धावपळीत जाईल. भावंडांची मदत मोलाची ठरेल. मन प्रसन्न राहील. नवीन ओळख वाढवावी.

मीन
चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. घरातील महत्त्वाच्या कामात हातभार लावाल. गोड शब्दात मत मांडावे. शक्यतो नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. चांगल्या गोष्टीसाठी खर्च करा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button