नेप्ती गावचे ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यात्रौत्सवाची सांगता

अहमदनगर -नेप्ती (ता. नगर) गावचे ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यात्रेनिमित्त भरावीण्यात आलेल्या हगाम्यानी यात्रेची सांगता झाली. येथील मल्लांनी बाहेर गावामधून आलेल्या मल्लांना चितपट करत हगामा गाजवला.
नेप्ती ( ता.नगर ) येथे दोन दिवस बिरोबा यात्रा उत्सव झाला. दोन दिवसात धार्मीक कार्यक्रम व मनोरजनची कार्यक्रमाची रेलचेल झाली. यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी जंगी हगाम्याचे आयोजन केले होते . जिल्हयामधून पहिलवानानी हजेरी लावली होती. नेप्ती गाव मल्लासाठी चांगले प्रसिद्ध आहे. या गावातील मल्लांनी आखाडा गाजवला. पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार माजी उपसरपंच शिवाजीराव होळकर पैलवान वसंतराव पवार पैलवान दादू चौगुले म्हणून यांनी काम पाहिले.
यावेळी माजी सरपंच विठ्ठल जपकर ,सरपंच संजय अशोक जपकर ,उपसरपंच संजय जपकर, माजी.उपसरपंच जालिंदर शिंदे , माजी पं.स.सदस्य देवा होले ,साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, प्रा. एकनाथ होले, रामदास फुले , नानासाहेब डोंगरे ,ग्रामपंचायत सदस्य फारुख सय्यद ,बंडू जपकर, संभाजी गडाख, एकनाथ जपकर बाबासाहेब होळकर, राहुल गवारे, सौरभ जपकर, भानुदास फुले ,अतुल जपकर ,जावेद सय्यद ,मच्छिंद्र होळकर, दिलीप होळकर , सुधाकर कदम ,विलास जपकर ,नितीन कदम ,अशोक जपकर ,राजाराम जपकर ,दशरथ जपकर ,सोमनाथ जपकर ,जबाजी कर्डिले, ज्ञानदेव जपकर, शिवाजी गाडेकर ,बाळासाहेब बेल्हेकर, बबन फुले ,संभाजी कांडेकर, उमर सय्यद, बबन सय्यद ,ॲड .उमेश नगरकर, कारभारी जपकर, देवराम जपकर, भास्कर जपकर, छबुराव जपकर, शांताराम साळवे मल्हारी कांडेकर, बबन कांडेकर पोलीस पाटील अरुण होले ,सत्तार सय्यद ,अभिजीत जपकर, सिताराम जपकर, एकनाथ होळकर यात्रा कमिटीचे कार्यकर्ते ,ग्रामस्थ व परिसरातील कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.