काशी,मथुरा,पंढरपूर ला जाण्यापूर्वी घरातील विठोबा रुखमाई ला जपा तरच पुण्य मिळेल- शोभाताई तांबे

अकोले,प्रतिनिधी
काशी,मथुरा,पंढरपूर येथे जाण्यापूर्वी आपल्या घरातील विठोबा रुखमाई ला जपा तरच तुम्हाला पुण्य मिळेल अन्यथा तुमचा जन्म व्यर्थ राहील असे प्रतिपादन ह.भ.प.शोभाताई तांबे यांनी केले अबीतखिंड (ता अकोले )येथील आदर्श माता बुधाबाई भोजने यांच्या स्मृतीपुरस्कार वितरण कार्यक्रमात केले .
सामाजिक कार्यकर्ते रामनाथ भोजने यांच्या मातोश्री आदर्श माताकै.बुधाबाई नामदेव भोजने यांच्या द्वितीय स्मृती दिना
निमित्त विविध उपक्रम राबविले या निमित्ताने विविध मान्यवरांना सह्याद्री गौरव पुरस्कार व संविधान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .हरिभक्त परायण शोभाताई तांबे,दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार शांताराम काळे, आदर्श शिक्षक व कोविड योद्धा दिपक बोऱ्हाडे , ह भ प पानसरे महाराज, एम एच टाईम चे संपादक गणेश आवारी, माजी सरपंच भानुदास गोडे , छायाताई रजपूत कार्याध्यक्ष निसर्ग व पर्यावरण महामंडळ, महाराष्ट्र राज्य, डॉ. पोपेरे ,साईनाथ वाळेकर शिक्षण अधिकारी,दिगंबर नवाळे क्रीडा शिक्षक या मान्यवरांचा त्यांच्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.त्यांना सहयाद्री भूषण व संविधान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी प्रमोद दादा मोरे अध्यक्ष निसर्ग व पर्यावरण महामंडळ महाराष्ट्र राज्य , माजी महापौर श्रीमती शकुंतला ताई धराडे ,प्राचार्या मंजुषा काळे,भास्कर एलमामे,सुनील सोनार,सरपंच यमुनाताई घनकुटे , ह.भ. प संतोष साबळे सर , सीताराम गोडे सर मुख्यद्यापक, अनंत तिटकरे सर , मा. पोलीस अधिकारी डी.एम.भांडकोळी, डॉ. रवींद्र जाधव , मिलिंद खरे,तसेच लालजी भोजने मुंबई, सुरेश भवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.रामनाथ भोजने यांनी आभार मानले.
यावेळी निसर्ग पर्यावरण महामंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या हस्ते वृक्ष भेट देण्यात आली
.आईची महती सांगताना ह भ प.शोभाताई तांबे यांनी उपस्थितांचे मने जिंकून त्यांच्या आई वडीलांबद्दल भावना जागृत करत डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली .तर आपल्या आईच्या स्मरणार्थ अनाथ मुलांची शाळा सुरू करण्याचा मनोदय संयोजक रामनाथ भोजने यांनी व्यक्त केला