इतर
महाराष्ट्र दिनी पळवे खुर्द येथे पाणपोई सुरू

दत्ता ठुबे
: पारनेर प्रतिनिधी :
आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री अंबादास तरटे मेजर यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्राथमिक आरोग्य केंद्र पळवे खुर्द व नगर पुणे रोडवरील पळवे फाटा येथे पाणपोई सुरू केल्या.
वैशाखात जाणवणारा उन्हाचा तडाख्यामुळे थंडगार पाणपोई सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या वेळी तात्यासाहेब देशमुख, भिमाजी शेळके मेजर,गोरख देशमुख,संभाजी पाचारणे,संभाजी इरकर, अंबादास तरटे मेजर, विजय जगताप, चांदभाई तांबोळी,फक्कड जाधव,शेख सिस्टर,कांबळे सिस्टर,दत्ता गाडीलकर,अमोल शेळके, नवनाथ तरटे मेजर,अमोल तरटे,नितीन गुंड,संकेत जगताप उपस्थित होते