रतनवाडी व घाटघर परीसराला मुसळधार पावसाने झोडपले
संजय महानोर
भंडारदरा प्रतिनिधी
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातखाचरे तुडुंब भरले असुन आदिवासी बांधवांनी भात लागवडीस सुरुवात केली आहे . तर पावसाचे माहेरघर समजल्या जाणा-या घाटघर मध्ये आठ पावसाची नोंद झाली आहे .
अकोले तालुक्यात दोन दिवसापासुन पावसाची सततधार सुरु असल्याने घाटघर , रतनवाडी , पांजरे व ईतर धरण पाणलोटातील गावांमधील भातखाचरे तुडुंब भरल्याचे चित्र दिसु लागले आहेत . त्यामुळे भात लागवडीला ( आवणी ) आता वेग आल्याचे दिसुन येत आहे . आदिवासी शेतकरी बांधवांनी पावसाला सुरुवात झाल्यापासुन भात लागवडीच्या तयारीला सुरुवात केली होती . पावसाला झालेल्या विलंबामुळे आदिवासी बांधवांच्या भात आवण्या रखडल्या होत्या .बुधवारी रतनवाडी व घाटघर परीसराला मुसळधार पावसाने झोडपुन काढले . त्यामुळे घाटघर येथील उर्ध्व उंदचन प्रकल्पही पुर्ण क्षमतेने भरुन वाहु लागल्याने पाणी भंडारदरा धरणाच्या दिशेने झुकु लागले आहे. तर उडदावणे येथील काळु नदीही दुथडी भरुन वाहताना दिसुन आली .
कळसुबाई शिखराच्या पायथ्याशीही पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णांवती नदी मोठ्या प्रमाणात वाहत असुन वाकी येथील लघु बंधारा ६१% भरला आहे . बुधवारी जोरदार कोसळणा-या पावसामळे भंडारद-यातील पर्जनमान मोजणा-या सर्व ठिकाणी पावसाने शतकी मजल मारल्याचे दिसुन आले .
गत चौविस तासात भंडारदरा येथे १३५मी मी पावसाची नोंद झाली असुन घाटघर येथे साडे सहा इंच म्हणजे १६६ मी मी पावसाची नोंद झाली .तर रतनवाडी येथे १४५ मी मी पाऊस पडला असुन पांजरे येथे १५६ मी मी तर वाकी येथे १०१ मी मी पाऊस पडला . सतत कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असुन पाऊस सुरु झाल्यापासुन एक टी एम सी च्या पुढे भंडारदरा धरणात नविन पाणी जमा झाले आहे . भंडारदरा धरणाचा सध्याचा पाणीसाठा ३२७३ दलघफुट असुन धरणामध्ये २४ तासात २६६ दलघफु नविन पाण्याची आवक होताना दिसुन आली . तर मागिल वर्षी आजच्या तारखेला भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ४९१२ दलघफुट होता तर चक्क या कालावधीत पावसाने विश्रांती पण घेतली होती . गुरुवारी सकाळी सहा ते संध्याकाळी भंडारदरा येथे ३७ मी मी पावसाची नोंद झाली असुन धरणाचा पाणीसाठाही ३४८१ दलघफु झाला होता .भंडारदरा धरण संध्याकाळपर्यंत ३१% भरले होते.
————————-
॰॥॰ भंडारदरा धरण ॰॥॰
दि.08 / 07 / 2022 सायंकाळी 18 . 00 वाजता.
आर.एल.-> 2386 .93 मीटर -> 727 . 54
लेव्हल -> 159 . 30 साठा -> 3744 द.ल.घ.फु (33.92%)
विसर्ग -> निरंक पाऊस -> 45 . 00 मी.मी.
वाकी ल.पा.तलाव.
लेव्हल -> 704 . 10 मीटर
साठा -> 88 . 39 द.ल.घ.फु.(78.46%)