येवला शहरात कामगार दिना निमित्त ‘आपला दवाखान्या’ चे उदघाटन!

– नाशिक प्रतिनिधी :- ( डॉ.शेरूभाई मोमीन )
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या महत्त्वाकांक्षी योजनेचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला .येवले शहरातील हॉटेल कैलास मागे बदापूर रोड लगत, वल्लभनगर येथे, आज – आपला दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी येवला येथील तहसीलदार लालश्री. आबासाहेब महाजन , गटविकास अधिकारी श्री अन्सार शेख, ,येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री नागेंद्र मुतकेकर, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कातकडे , उपजिल्हा रुग्णालय अधीक्षका डॉ. शैलजा कुप्पा स्वामी , बाळासाहेब लोखंडे, स्वाभिमानी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष, जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, प्रदीप सोनवणे, यांसह, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, समुदाय आरोग्य अधिकारी व. तालुक्यातील सर्वच आरोग्य कर्मचारी तसेच वल्लभनगर येथील नागरिक या अभिनव उपक्रमासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते . आरोग्य विभागाचा हा ऑनलाईन उद्घघाटनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सदर प्रास्तविक डॉ. शरद कातकाडे यांनी केले, आभार डॉ. हनुमान पळवे यांनी मानले,