इतर

रविवारी सोलापुरात पद्म-बिझनेस वुमन व पद्म-जलपरी पुरस्कार’ वितरण सोहळा

सोलापूर : येथील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम व पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने’ आयोजित पद्मशाली समाजात अनेक महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.

स्वतःच्या कर्तृत्वाने उंच भरारी घेउन कर्तृत्व व नेतृत्व सिध्द करत आहेत. अशा काही निवड केलेल्या आठ महिलांना ‘पद्म – बिझनेस वुमन अवॉर्ड’ तर, दोन महिलांना ‘पद्म – जलपरी पुरस्कार’ रविवार, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या विणकर सभागृहात होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम, सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, सचिव रुचिरा मासम, कार्याध्यक्षा सविता येदूर आणि पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी यांनी दिले आहे.

पुरस्कार सोहळा कार्यक्रम आ. देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष भूपती कमटम, नगरसेवक प्रथमेश कोठे, सत्यनारायण गुर्रम, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम, श्री मार्कंडेय रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे खजिनदार अंबादास बिंगी यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण कार्यक्रम होणार आहे. उद्योजक श्रीधर सुरा यांच्यातर्फे स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व नॅपकीन बुके प्रदान करण्यात येईल. ही निवड फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा कार्यक्रम होणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यास पद्मशाली समाजातील बंधू व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती रहावे, असे आवाहन लक्ष्मण दोंतूल, श्रीनिवास कामूर्ती, नागेश पासकंटी, सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती, वैकुंठम् जडल, ओमसी पल्ली, सखी संघम’च्या ममता मुदगुंडी, मेघा इट्टम, ममता तलकोकूल, गीता भूदत्त, पल्लवी संगा, हेमा मैलारी, वनिता सुरम, पद्मा मेडपल्ली, भाग्यलक्ष्मी तुम्मा, स्वाती बोगा, पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी यांच्यासह आदींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button