उंचखडक बुद्रुक येथील श्री क्षेत्र राममाळ येथील रामंदिराच्या जिर्णोद्धरास सुरुवात..!!

अकोले : सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र राममाळ उंचखडक बुद्रुक तालुका अकोले येथे प्रभु श्री रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमीत्त… श्री संत सद्गुरू यशवंतबाबा यांचे आशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व हनुमान चरित्र कथेस गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बुधवार दिनांक २२ मार्च २०२३ रोजी सप्ताहाचे मार्गदर्शक योगी केशवबाबा चौधरी,समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर),ह.भ.प.मनोहर महाराज भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ठिक ०९:०० वाजता भाविक भक्तांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहन होऊन प्रारंभ होत आहे.तरी भावीक भक्तांनी ह.भ.प.बाळा महाराज जाधव,दौलत महाराज शेटे, सोमनाथ महाराज भोर,कैलास महाराज आहेर,संदिप महाराज सावंत,नितीन महाराज देशमुख,गणेश महाराज वाकचौरे, रविंद्र महाराज गुंजाळ यांचे दिनांक २२-०३-२०२३ ते २९-०३-२०२३ दरम्यान रोज नियमित रात्री ०७:०० ते ०९:०० या वेळेत हरिकिर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच गुरुवार दिनांक ३०-०३-२०२३ रोजी सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत भागवताचार्य ह.भ.प.विठ्ठलपंत गोंडे महाराज श्री क्षेत्र राममाळ उंचखडक बुद्रुक यांचे रामजन्माचे कीर्तन होईल तसेच ह.भ.प.मनोहर महाराज भोर यांचे जागर कीर्तन होईल.शुक्रवार दिनांक ३१-०३-२०२३ रोजी सकाळी ०७:०० ते ०९:०० या वेळेत पालखी मिरवणूक सोहळा संपन्न होऊन सकाळी ०९:०० ते ११:०० या वेळेत ह.भ.प.मदन महाराज वर्पे (चिकणी) यांचे सुश्राव्य असे काल्याचे कीर्तन होऊन नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.श्री क्षेत्र राममाळ उंचखडक बुद्रुक या देवस्थानाला अकोले तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात एक ऐतिहासिक परंपरा आहे भगवान श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक रामजन्मासाठी उपस्थित राहतात,आज अयोध्येत भव्य अशा रामंदिराचे निर्माण होत असतांनाच श्री क्षेत्र राममाळ उंचखडक बुद्रुक येथील राममंदिराच्या देखील जिर्णोध्दाराचे काम सुरु झाले असुन श्री सद्गुरू यशवंतबाबा धार्मिक ट्रस्टचे अध्यक्ष श्री.दशरथराव सावंत, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक तथा अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तसेच ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री.अशोकराव देशमुख, सरचिटणीस योगी केशवबाबा चौधरी व सर्व विश्वस्त त्याचबरोबर उंचखडक बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने तालुक्यातील श्रीराम भक्तांना,भक्त भावीकांना राममंदिर निर्माणासाठी देणगी स्वरुपात मदत करुन या भव्य अशा निर्मीतीत भागीदार होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.