ग्रामीण तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे -हर्षदाताई काकडे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
पारंपारिक शेती उद्योगाला जोड म्हणून छोटे-मोठे जोडधंदे उभे करा, त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राची मदत घ्या त्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करण्यासाठी काकडे कुटुंबीयांकडून सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल. ग्रामीण तरुणांनी उद्योग व्यवसाय व उच्च शिक्षणासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळही दिले जाईल. शेतकरी व तरुणांनी उद्योग व्यवसायासाठी भरारी घेतली पाहिजे असे मत जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांनी मांडले.
शेवगाव – नेवासा राज मार्गावरील भायगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या शासन धोरणानुसार भायगाव व मजलेशहर साठी स्वतंत्र भायगाव सजा या तलाठी कार्यालयाच्या उद्घाटन,दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालकांचा सत्कार समारंभ प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे बोलत होत्या . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे,आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे पृथ्वीसिंह काकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल बेडके, भायगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. मनीषाताई आढाव, उपस्थित होते. ग्रामीण भागातील छोटे मोठे उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकरी, तरुण व तरुणीसाठी लवकरच जिल्हा उद्योग केंद्र मार्फत भायगाव मध्ये शिबिर घेण्यात येणार आहे. त्यामध्ये उद्योग व्यवसाय व त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक बाजूसाठी संपूर्ण माहिती उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर केले. यावेळी युवा नेते राजेंद्र आढाव, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन कल्याण आढाव, भगवान आढाव,गणपत आढाव,जनार्दन लांडे, हरिचंद्र आढाव, सदाशिव शेकडे, पंढरीनाथ सांगळे, डॉ.रामराव आढाव, विष्णू महाराज दुकळे, डॉ.परवेज सय्यद, भायगावच्या उपसरपंच आशाताई लांडे, माजी सरपंच रामनाथ आढाव, डॉ.विजय खेडकर,रावसाहेब आढाव, भातकुडगावचे मंडलाधिकारी आप्पासाहेब शिंदे, कामगार तलाठी प्रदीप मगर, मुक्तार शेख, शिवाजी लांडे, मच्छिंद्र आढाव, रामदास शेकडे, अविनाश देशपांडे, कानिफनाथ घाडगे, सुभाष सौदागर, ग्रामविकास अधिकारी एस.जे. शेख, आप्पासाहेब सौदागर, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र आढाव यांनी केले तर आभार हरिभाऊ अकोलकर यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाराम आगळे यांनी केले.
भायगावच्या वैभवात भर
महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार भायगाव व मजलेशहर करिता स्वतंत्र तलाठी कार्यालय भायगाव या मुख्यालयचे आज ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे,जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे व आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे पृथ्वीसिंह काकडे यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला.या कार्यालयाचा फायदा भायगाव व मजलेशहर येथील दोन्ही गावातील शेतकऱ्यासह शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनीला होणार असल्यामुळे भायगावच्या वैभवात निश्चितच भर पडेल.मनीषाताई आढाव
लोकनियुक्त सरपंच भायगाव