इतर

संगमनेरच्या सरकारी विश्रामगृहाची खानावळ करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करा, बांधकाम विभागाकडे केली मागणी

संजय साबळे

संगमनेर /प्रतिनिधी

शासकीय सेवेत असतांना सरकारी मालमत्तेचा दुरुपयोग करून खासगी व्यवसाय करणाऱ्या स्वयंपाक्या विरोधात कारवाई करण्यात यावी अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा जिल्ह्यात मोठा कार्यविस्तार आहे. या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात उपविभागातील विविध शासकीय विश्रामगृहांचे व्यवस्थापन, नियमन व नियंत्रण समाविष्ट आहे पर्यायाने अन्य महत्वाच्या जबाबदान्यांबरोबरच शासकीय मालकीच्या विश्रामगृहांचे नियंत्रण नियमन व त्याची अंमलबजावणी करण्याची पहिली जबाबदारी या उपविभागाचे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंत्यांची आहे.
संगमनेर श्रमिक पत्रकार संघ शहरातील पत्रकारांच्या शीर्ष संघटनेच्यावतीने निदर्शनास आणू इच्छितो की, येथील कार्यकारी अभियंतांच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहाचा गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जात आहे. या ठिकाणी कार्यरत असलेला बांधकाम विभागाचा रवी खरपूडे नावाचा कर्मचारी (स्वयंपाकी )बिनबोभाटपणे शासकीय मालकीच्या विविध संसाधनांचा वास्तूचा (यात डायनींग हॉल, मिटींग हॉल, बैठक कक्ष, लाईट, पंखे व वातानुकुलीत यंत्रणा.) परिपूर्ण वापर करून आपल्या आर्थिक फायद्यासाठी खासगी खानावळ चालवत आहे. हा प्रकार बेकायदा, शिस्तभंग करणारा आणि शासनाची फसवणूक करणारा आहे.

वास्तविक सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या मुख्य कार्यालयाच्या आवारातच त्याचा हा खासगी उद्योग भरभराटीला येवूनही आजपर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्याच्या या उद्योगाला विभागातील वरीष्ठ अधिकान्यांचेच पाठबळ असल्याचेही यासर्व घडामोडींमधून दिसून येत आहे त्याचा परिपाक या कर्मचान्याच्या वागणूकीवर झाला असून आपणच या मालमत्तेचे मालक असल्याच्या अविर्भावात सध्या तो बावरत आहे. शासकीय संसाधनांचा पूर्ण वापर करत या स्वयंपाक्याने मोठी माया कमावली असून त्याचे विवरणही आम्ही प्राप्त केले आहे.

सदर बेकायदा कृत्यास जबाबदार धरून संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात कार्यरत असलेल्या रवी खरपूड़े या स्वयंपाक्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर प्रचलित पद्धतीने शिस्तगंगाची कारवाई करावी, चौकशी पूर्ण होईस्तोवर त्याला सेवेतून निलंबित करावे अशी आमची रास्त मागणी आहे. सदरील तक्रार अर्जाची दखल घेवून आपण पुढील आठ दिवसांत संबंधितावर कठोर कारवाई करून शासकीय विश्रामगृहाचा आणि मालमत्तेचा खासगी दुरुपयोग थांबवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

या उपरांतही संबंधित कर्मचान्यावर कारवाई न झाल्यास संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात आंदोलन पुकारण्यात येईल व त्यासाठी कायदेशीर मार्गाचाही अवलंब केला जाईल असा इशारा संगमनेर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन ओझा ,उपाध्यक्ष सतीश आहेर, कोषाध्यक्ष नीलिमा घाडगे, सचिव सुनील महाले ,सदस्य श्याम तिवारी ,गोरक्षनाथ मदने ,आनंद गायकवाड ,शेखर पानसरे ,सचिन जंत्रे, गोरक्ष नेहे, अमोल मतकर ,अंकुश बुब ,सोमनाथ काळे, संजय अहिरे, भारत रेघाटे, मंगेश सालपे, संदीप वाकचौरे ,धीरज ठाकूर ,सुशांत पावसे, संजय साबळे व काशिनाथ गोसावी आदींनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button