निफाड पोलीस चौकी समोर उघडा नाला बनला धोकादायक !

नाशिक जिल्हा प्रतिनिधी :
लासलगाव ता. निफाड येथील पोलीस चौकी समोरील लालाजी भेळ भत्ते वाले, यांच्या दुकाना शेजारी लगत नाल्याला झाकण ढापा नसल्यामुळे उघड्या नाल्यात पडून अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे
गेल्या काही दिवसापूर्वी या नाल्यांमध्ये एक लहान मुलगा पडला होता त्याला मोठ्या प्रमाणात इजा झालेली होती, अपघात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, तरी सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित अधिकारी निफाड व नाशिक यांचा हालगर्जीपणा मनमानी भ्रष्टाचारी कारभार प्रलंबित कामांमध्ये सतत, होणारी, दिरंगाई व. नागरिकांना उडवा – उडवी ची उत्तरे, यास तात्काळपणे पाय बंद घालण्यात यावा असे, निवेदन स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, अन्याय – भ्रष्टाचार निवारण जनहीत समिती, लोकशाही मराठी पत्रकार संघ, यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या कडे निवेदन सादर करण्यात आले
, , उघड्या, खड्ड्याच्या ठिकाणी तातडीने ढापा बसून कामास त्वरित गती द्यावी निकृष्ट दर्जाचे कामांची सखोल चौकशी करून सदर संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे.व परवाना रद्द करावा, अशी मागणी, या परिसरातील, संतप्त, नागरिकांसह, लोकशाही मराठी पत्रकार संघ, स्वाभिमानी सेना, नाशिक जिल्हाध्यक्ष, जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांनी एका निवेदनाद्वारे केलेली आहेत.अन्यथा, भारतीय संविधानिक लोकशाही मार्गाने, बेमुदत आमरण उपोषणास बसनार आहेत..