अहमदनगर

जखणगांव च्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारले भव्य सभागृह !

जिल्हाधिकारी सिद्धाराम शालीमठ यांचे हस्ते लोकार्पण

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :
आरोग्य ग्राम जखणगांव ता नगर येथील ७ लाख रुपये लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या बहुद्देशीय सभागृहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सिद्धाराम शालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. गावात मोठा सभामंडप नसल्याने नागरिकांना प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमास पैसे मोजुन मांडव द्यावा लागत असे.यंदा तर गावातील अखंड हरिनाम सप्ताहात पावसाने पहिल्याच दिवशी फजिती केली.मांडव फाटला ,सरपंच डाँ. सुनिल गंधे यांच्या मार्गदर्शनाखालीच गावातील कारागीर व तरूणांची फौज कामाला लागली व अवघ्या ५० तासात ५००० स्केअरफुट चा भव्य दिव्य बहुद्देशीय सभागृह उभारण्यात आला.
सदर सभामंडप गावात मोक्याच्या ठिकाणी असुन सर्व जातीधर्माच्या लोकांचा हा उभारण्यात सिंहाचा वाटा आहे. आज याचे लोकार्पण जिल्हाधिकारी शालीग्राम सालीमठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर, प्रांताधिकारी सुधीर पाटिल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सुभाष लांगोटे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जखणगांव चे सरपंच डॉ. सुनिल गंधे, चेअरमन बाळासाहेब कर्डीले, दत्ता वाळके, बाळासाहेब शहाणे, रमेश आंग्रे, अल्ताफ शेख, प्रवीण पानसंबळ, सुभाष सौदागर, डाँ. सुयश गंधे, भीमराज सौदागर, महेश चाबूकस्वार, दत्ता भीसे,अशोक कर्डिले,भाऊसाहेब कर्डिले, सहदेव वाबळे,रजनी गंधे, सुरेश कार्ले, मुजीब शेख,तात्या कर्डिले उपस्थित होते. यावेळी डाँ. सुनिल गंधे यांनी गावात राबविण्यात येत असलेल्या संपूर्ण आरोग्य ग्राम प्रकल्पाची माहिती पाहुण्यांना दिली. आरोग्य ग्राम हा अभिनव प्रयोग असुन जखणगांव मध्ये त्याचे चालू असलेले काम नक्की च वाखाणण्याजोगे आहे अशा भावना सर्वांनी व्यक्त केला.यावेळी मान्यवरांचा ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन उबाळे यांनी केले तर महेश चाबूकस्वार यांनी आभार मानले.
जखणगांव मध्ये दोनच दिवसात लोकसहभागातून उभारण्यात आलेले हे भव्य सभागृह हा जिल्ह्यात चर्चेचा व आश्चर्याचा विषय असुन लोकांमध्ये यामुळे जखणगांव चे नाव गाजत आहे.
आरोग्य ग्राम जखणगांव ता नगर येथील लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या बहुद्देशीय सभागृहाचे उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम शालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,प्रांताधिकारी सुधीर पाटिल जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जखणगांव चे सरपंच डॉ. सुनिल गंधे, चेअरमन बाळासाहेब कर्डीले, दत्ता वाळके, बाळासाहेब शहाणे, रमेश आंग्रे, अल्ताफ शेख, प्रवीण पानसंबळ, सुभाष सौदागर, डाँ. सुयश गंधे, भीमराज सौदागर, महेश चाबूकस्वार, दत्ता भीसे,अशोक कर्डिले यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button