इतर

बाबासाहेब ठुबेंच्या जिवनपटात पाणी आणि पाण्यासाठीचा संघर्षच

दत्ता ठुबे

पारनेर: ज्या काळात आणि तालुक्यातील ज्या भागात पिण्याच्या पाण्याची भ्रांत होती त्या काळात आणि त्या तालुक्यातील भागाच्या शेतीसाठी पाण्याचं स्वप्न पाहणं किंवा ते तालुक्यातील कष्टकरी, कामकरी आणि शेतकऱ्यांना दाखवणं हे किती अवघड आणि जिकीरीचे होते ह्याची प्रचिती स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी केल्यानंतरही सर्वांना येत असल्याने पारनेर तालुक्याचे माजी आमदार कै. कॉम्रेड बाबासाहेब ठुबे यांनी त्यांच्या हयातीत पाण्यासाठी उभारलेला लढा किती अनमोल आणि संघर्षमय असेल हे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आले असल्याने व आजही पारनेर तालुक्यातील कोरडवाहू भागातील बहुतांश गावांना पिण्याच्या व शेतीसाठीच्या पाण्यासाठी वरदान ठरत असलेले एकुण २७६ पाझर तलाव बाबासाहेब ठुबेंच्या आमदारकीच्या कार्यकालातच झालेले असल्याने त्यांच्या या पारनेरच्या कोरडवाहू भागातील पाण्याच्या समृद्धीबाबतचे अतुलनीय योगदान पाहुन यापुढे १४ मे रोजी असणाऱ्या त्यांच्या जयंतीदिनी प्रत्येक वर्षी पाणी परीषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा पारनेरच्या कोरडवाहू भागातील पाण्यासाठी संघर्ष उभा करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कृती समितीच्या वतीने करण्यात आली.

रविवार दि. १४ मे रोजी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज व पारनेर तालुक्याचे माजी आमदार कै.कॉम्रेड बाबासाहेब ठुबे यांच्या जयंतीनिमित्त कान्हुर पठार येथील मुख्य चौकात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कृती समितीचे सदस्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी पठार गावचे माजी सरपंच वसंतराव शिंदे व सुभाष ठुबे सर यांच्या उपस्थितीत कान्हुर पठार गावचे सामाजिक कार्यकर्ते, कृती समितीचे सदस्य व नाशिकस्थित उद्योजक अब्बासभाई मुजावर यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आझाद ठुबे, कान्हुर पठार गावचे सरपंच गोकुळमामा काकडे, उपसरपंच सागर व्यवहारे, कान्हुर पठार वि.का.सोसायटीचे चेअरमन कांतीलाल साळवे, माजी चेअरमन राजाराम ठुबे गुरुजी, राजे शिवाजी पतसंस्थेचे व्हा चेअरमन शमशुद्दीन इनामदार, परबत गुरुजी, ॲड ठुबे भाऊसाहेब, अक्कलवाडी गावचे माजी सरपंच दादाभाऊ नरवडे, वडगाव दर्या येथील मोहनराव परांडे, बाळासाहेब गुंड, गारगुंडी गावचे उपसरपंच प्रशांत झावरे, माजी सरपंच रंगनाथ फापाळे, विरोली गावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सावकार बुचूडे, वेसदरे गावचे माजी सरपंच किशोर रोकडे, पिंपळगाव रोठा येथील जगताप, बाभुळवाडा गावचे खणकर डॉक्टर, पुणेवाडी गावचे माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, पाडळी दर्या गावचे सरपंच रामदास खोसे, चिंचोली गावचे माजी सरपंच सतीश पिंपरकर, पिंपळगाव तुर्कचे आशिफ शेख, करंदी गावचे सरपंच भास्कर गव्हाणे, किन्ही गावचे विठ्ठल खोडदे यांसह राजे शिवाजी पतसंस्थेचे संचालक, कर्मचारी व पठारभागातील विविध गावचे ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायट्यांचे संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आझाद ठुबे, पारनेरच्या पाण्यासाठीच्या संघर्षात के.बाबासाहेब ठुबेंपासुन आजतागायत अनमोल योगदान असलेले वसंतराव शिंदे, एस.एल. ठुबे सर, परबत गुरुजी, ॲड.ठुबे भाऊसाहेब, रावसाहेब फुलमाळी, राजेंद्र ठुबे, विठ्ठल खोडदे, बाळासाहेब सोनावळे, जगताप, राजाराम ठुबे गुरुजी यांसह विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून छत्रपती संभाजी महाराज व कॉम्रेड बाबासाहेब ठुबे यांच्या संघर्षमय जीवनाचा उलगडा केला. बाळासाहेब ठुबे यांनी पारनेरच्या कोरडवाहू भागातील शेतीच्या पाण्यासाठी केलेल्या संघर्षाचा उलगडा केला. पाटपाणी आणण्यासाठी अडथळे आल्यानंतर ठुबे यांनी न थांबता तालुक्यातील कोरडवाहू भागात बांधलेल्या २६७ पाझरतलावांच्या केलेल्या उभारणीतील प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या उलगड्याने उपस्थित जनसमुदाय भारावून गेला होता. तालुक्यातील उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित, शेतकरी, कष्टकरी व कामकरी समाजबांधवांसाठी बाबासाहेब ठुबे यांनी केलेल्या कामाचा उहापोह झाला.

याप्रसंगी बोलताना आझाद ठुबे यांनी राजकारण विरहित एक भुमिपुत्र म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले. एस एल ठुबे सर यांनी कै.बाबासाहेब ठुबे यांनी आयुष्यभर अविरतपणे पारनेरच्या कोरडवाहू भागातील शेतीसाठी चालविलेला पाण्यासाठीचा संघर्ष यापुढेही सातत्याने सुरु ठेवणे हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल असे सांगितले तर उद्योजक अब्बासभाई मुजावर यांनी तालुक्याच्या कोरडवाहू भागातील शेतीच्या पाण्यासाठी कुठल्याही प्रकारची शंका मनात न ठेवता पक्षीय जोडे बाजूला ठेवून सर्वांना संघटीत होण्याचे आवाहन केले. वसंतराव शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शासनाला संबंधित योजना सुरू करण्यासाठी सौर उर्जेचा प्लॅट उभा करण्यासाठी गरज भासल्यास पिंपरीपठार गावातील गायरान जमिनीसह जवळजवळ सव्वाशे एकर जमीन भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवत संबंधित योजना राबविण्यात येत असताना कुणीही श्रेय लाटण्याची किंवा राजकीय संबंध न जोडण्याची विनंती केली. एकंदरीत छत्रपती संभाजी महाराज व कॉम्रेड बाबासाहेब ठुबे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शेतीसाठी पाणी मिळावं हाच प्रमुख मुद्दा राहीला असल्याचे दिसून आले.


पारनेरच्या कोरडवाहू भागातील शेतीसाठी चालविलेला पाणीसंघर्ष उद्याच्या काळात अधिकच तीव्र होऊ शकतो याची उपस्थितांना व तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मातब्बरांना जाणिव झाली असुन जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा आणि आत्मियतेचा विषय असलेल्या पाणी प्रश्नाच्या विरोधात इच्छा असली तरीही उघड भुमिका घेण गल्लीपासुन दिल्लीपर्यंत पोहचलेल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मातब्बरांना एकवटत असलेला जनसमुदाय पाहुन अशक्य होऊन बसल्याने अनेकांच्या जीवनाचे प्रवाह बदलण्यास हे पठारावरील शेतीचे पाणी उद्याच्या काळात भाग पाडू शकते ह्याची प्रचिती येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button