वासुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन सम्पन्न

दत्ता ठुबे
पारनेर:-न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे ता.पारनेर येथील सन 2000 च्या दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन 14 मे रविवार रोजी मांडओहोळ याठिकाणी पार पडले. तब्ब्ल 23 वर्षांनी पुन्हा शाळा भरली. गुरुजनांचे आगमन झाल्यावर माजी विद्यार्थिनींनी शिक्षकांचे औक्षण करत इतरांनी गुरूंवर फुलांचा वर्षाव करत शिक्षकांचे थाटात स्वागत केले. नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने विविध ठिकाणी विखूरलेले 45 माजी विद्यार्थी विद्यार्थिनी तब्ब्ल 23 वर्षानंतर आवर्जून उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचा प्रारंभ सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने करण्यात आला. यावेळी दिवंगत शिक्षक व दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली देण्यात आली.या स्नेहसंमेलनाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मा.श्री. विष्णू जाधव सर यांची निवड करण्यात आली. शिक्षकांचे शाल, पुष्पगुच्छ,स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थित विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देत नोकरी -व्यवसाय करत असताना आलेले अनुभव व बालपणातील संकटावर केलेली मात, शाळेच्या गमतीजमती, शिक्षकांविषयी असलेली आदरयुक्त भीती व्यक्त केली. शिक्षकांनीही काही जुन्या आठवणी सांगून आजची पिढी व मागची पिढी यामधील फरक सांगितला व अशा कार्यक्रमाची नितांत गरज का आहे हे पटवून दिले.आपले विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात पारंगत झालेले पाहून आनंद व्यक्त करत शिक्षकांनी शुभाशीर्वाद दिले.ही आगळीवेगळी भरलेली शाळा सुटूच नये असंच प्रत्येकाला वाटत होत. शेवटी शाळेची घंटाही वाजली अन शेवटी सावधान विश्राम म्हणत गुरुजींच्या आज्ञानुसार कार्यक्रमाची सांगता जण गण मन या राष्ट्रागीताने करण्यात आली. सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला

.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री विष्णू जाधव सर तसेच श्री रामचंद्र झावरे सर श्री रभाजी झावरे सर , श्री बाळासाहेब भालके सर , श्री लहू शिंदे सर,श्री भाऊसाहेब आहेर सर , श्री विलास भांड सर, श्री प्रकाश इघे सर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थीनी निलम आंधळे व माजी विद्यार्थी तुकाराम ठाणगे यांनी केले, रेश्मा झावरे यांनी प्रस्ताविक सादर केले तसेच कल्पना बर्वे यांनी गुरुजींचे आभार तर हनुमान दाते यांनी स्नेहसंमेलनाचे आभार मानले.कमी कालावधीतील हे अत्यंत सुंदर नियोजन शाळेचे माजी विद्यार्थी अरुण वाबळे, हनुमान दाते, शंकर साळुंके ,राहुल गायखे, गणेश उगले, नारायण दाते ,गणेश झावरे, सचिन वाबळे, शंकर बर्वे, साहेबराव झावरे, कविता रोकडे व इतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी केले.