सोलापूर भाजपा शहर मध्यचे उमेदवार श्री देवेंद्र कोठे यांना मंत्रिमंडळात संधी द्या !

–
सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाचे एकमेव आमदार आणि सोलापूर भाजपाचे शहर मध्यचे विजयी उमेदवार श्री देवेंद्र कोठे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री पदावर संधी मिळावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे
सोलापूर व महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाचे आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार
पहिल्यांदाच विधानसभा निवडणुक लढणारे श्री देवेंद्र राजेश कोठे हे भरघोस मताधिक्यानी निवडुन आले आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पद्मशाली समाजासाठी भूषणावह आहे. त्याची उमेदवारी उशीरा घोषणा होऊनही रात्रदिवस स्वतः श्री देवेंद्र राजेश कोठे, त्यांचे परिवार, संघाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते भाजपाचे ज्येष्ठ व श्रेष्ठ नेते, कार्यकर्ते, महायुतीचे नेते, कार्यकर्ते, पद्मशाली समाजाचे बंधू भगिनीनी काही संघटनेचे
पदाधिकारी यांच्यासह आणि ओळखी अनोळखी अनेक नागरिकांनी श्री देवेंद्र कोठे यांच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेतले आहे.
श्री देवेंद्र कोठे हे तरुण आहेत, त्यांच्याकडून सोलापूरकरांची व पद्मशाली समाजातील अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत महाराष्ट्रात पद्मशाली समाजाची असलेली लोकसंख्या विचारात घेणेही महत्वाचे आहे. यासाठी श्री देवेंद्र कोठे यांनामंत्रिमंडळात
स्थान दिल्यास समाजासह इतर अनेक प्रश्न मार्गी लागतील यात शंका नाही.
श्री देवेंद्र राजेश कोठे यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे.अशी मागणीश्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, सोलापूर संचलित पद्मशाली सखी संघम, सोलापूर च्या
मेघा विष्णू हट्टम ( अध्यक्षा) कल्याणी अंबादास पेनगोंडा (उपाध्यक्षा) मंजुळा मार्कडेय आडम (उपाध्यक्षा)
पूजा अरविंद चिप्पा (सचिव) कल्पना ज्ञानेश्वर अर्शनपल्ली (सल्लागार) यांनी निवेदनाद्वारे केली आहे