कृषी मंत्री अब्दुल सत्तार नगर जिल्ह्यात आल्यास चपलांचा हार घालणार आमदार निलेश लंके

पारनेर राष्ट्रवादी च्या वतीने
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
सध्याच्या खोके सरकार मधील बोक्के मंत्री हे खोके घेवुन माजले असून नगर जिल्ह्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस चपलांचा हार घालणार असल्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दिले आहे.पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी सकाळी पारनेर येथील लालचौकात कृषी मंत्री अब्दुल सत्तार जोडो मार”आंदोलन करण्यात आले
यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की कृषीमंत्री सत्तार याची लायकी व कुत्र्याची लायकी एक असुन की कुत्रा ईमानदार आहे तुझी कुत्रा बरोबर तुलना करण्याची लायकी नाही असेही आमदार निलेश लंके म्हणाले आहे. त्यामुळे कुत्रा चिन्हावर निवडुन येण्याची भाषा निंदनीय व बेताल आहे त्यामुळे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वर आक्षेपार्ह टिका टिपण्णी केली असून तु किती बंदोबस्त नगर जिल्हात ये चपलांचा हार घालणार असे आवाहनही आमदार निलेश लंके यांनी दिले आहे.ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही असेही व्यक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचे आमदार लंके म्हणाले.
यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की
महिलांचा सन्मान व आरक्षण देण्याचे काम शरद पवार यांनी केले असताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी वारसा चालविण्याचे काम केले आहेे.त्यांच्यावर टिका टिपण्णी करून आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहीर केली आहे.त्यामुळे
कर्तव्य शून्य व बेताल वक्तव्य करणाऱ्या हा वाचाळवीर मंत्री असुन बदला घेतल्या शिवाय राहणार नाही.हा विषय किंवा अपमान केवळ सुप्रियाताई बद्दल नाही तर महाराष्ट्रातील महिलांचा व माता भगिनींचा अपमान केला आहे.गाड्या फोडणे हा आमचा जुना पिंड आहे त्यामुळे पोलिस बंदोबस्तात तु जिल्हात ये ,गाड्या फोडल्याशिवाय गप बसणार नाही असेही आमदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.
यावेळी आमदार निलेश लंके यांच्या सह जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, रा.या.औटी, माजी सभापती गंगाराम बेलकर,सुदाम पवार दादा शिंदे कारभारी पोटघन मेजर, जितैश सरडे, नंदकुमार देशमुख, युवक तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, सोमनाथ वरखडे ,डॉ बाळासाहेब कावरे ,विजय डोळ ,उपनगराध्यक्ष सौ सुरेखा भालेकर , सभापती डॉ विदया कावरे, सभापती प्रियंका औटी, नगरसेविका हिमिनी नगरे, निता औटी, सुप्रियाताई शिंदे,पाकीजा शेख, वैजयंता मते, दिपाली औटी, जिल्हाध्यक्ष राजेश्वरी कोठावळे,वंदाताई गंधाक्ते, उमाताई बोरूडे,मानसी लहाकर, विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष हर्षदा मापारी, नारायण गव्हाण सरपंच मनिषा जाधव,महिला उपाध्यक्ष सुरेखा कोठावळे, बंडु गायकवाड,रमीज राजे, डॉ सादिक राजे,बाळासाहेब खिलारी दौलत गांगड महेंद्र गायकवाड उपाध्यक्ष रवींद्र गायके अमोल उगले स्वप्निल झावरे यांच्या सह विविध गावचे सरपंच उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
– गद्दार सत्तारचा तीव्र निषेध..
तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे
दोन वेळा संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या पुरोगामी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत ज्या महिलांना सन्मान दिला त्याने महिलांचा अपमान केला आहे.संपुर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे झोडपून काढला असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही.जिल्हाधिकारांना तुम्ही दारू पिता का असा सवाल करत आहेत.त्यांना सत्तेचा माज आला आहे त्यामुळे सरकारचा कडेलोट करण्याची वेळ आली आहे.त्यामुळे जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे शांत बसणार नसुन रस्तावर उतरुन या गद्दार सत्तारचा तीव्र निषेध केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी म्हटले आहे.