चास येथील भैरवनाथ आधार प्रतिष्ठान ने स्वातंत्र्यदिनी केला गुणवंतांचा सत्कार

अकोले प्रतिनिधी
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भैरवनाथ आधार प्रतिष्ठान, चास या स्वयंसेवी संस्थेने गुणवंत विद्यार्थी,खेळाडूंचा आणि उपक्रमशील शिक्षक जयवंत विश्वास भांगरे यांच्या सत्कार केला
कार्यक्रमप्रसंगी बोलताना माजी प्राचार्य धोंडीराम दुरगुडे यांनी भैरवनाथ आधार प्रतिष्ठान स्तुत्य उपक्रम राबवित असून ते समाजाला दिशा देणारे असतात, असे उदगार काढले.
यावेळी त्यांनी आपले बंधू कै. दामोदर सिताराम दुर्गुडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तालुका, जिल्हा व राज्यात चमकणाऱ्या चास येथील खेळाडूंना भरघोस बक्षिसे जाहीर केली.
यावेळी इयत्ता दहावीतील कुणाल कैलास मांडे प्रथम ,आरती संतोष कोठवळ द्वितीय ,ओंकार विठ्ठल दुर्गुडे तृतीय व बारावीतील श्वेता गुलाब शेळके प्रथम, लक्ष्मी बाळू कडाळे द्वितीय,मोनिका संजय चव्हाण तृतीय या विद्यार्थ्यांना आधार प्रतिष्ठानने रोख रक्कम , ट्रॉफी शाल फेटा व बुके देऊन सत्कार करण्यात आला.तसेच दहावीत इंग्रजी ,गणित,विज्ञान या विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना दीपक चंद्रकांत शेळके, मुंबई यांनी रोख रक्कम देऊन सत्कार केला.तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाॅंदसुरज येथील उपक्रमशील शिक्षक जयवंत विश्वास भांगरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ पवार , उपाध्यक्ष संदीप जाधव, सुनील शेळके, नितीन शेळके, प्रवीण शेळके, रामदास शेळके, राहुल देशमुख,विजय दुर्गुडे,भारत शेळके, संजय गिरी,तानाजी वाडेकर,दिपक नामदेव शेळके तसेच चासगावच्या प्रथम नवनियुक्त महिला सरपंच सुरेखा शेळके,उपसरपंच सचिन शेळके,माजी सरपंच बाळासाहेब रामभाऊ शेळके, ग्रामपंचायत सदस्य सुनंदा शेळके, नंदा खैरे,नंदिनी जाधव,इंद्रायणी वाकळे,बाबुराव वाडेकर , सुनील बबन शेळके ,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शेळके,शिवव्याख्याते बाळासाहेब धोंडू शेळके, मेजर गणपत शेळके, सोसायटीचे चेअरमन प्रकाश गोडसे,माजी चेअरमन दत्तात्रय शेळके, चासचे पोलीस पाटील संदीप वाडेकर ,पोलीस पाटील चाॅंदसुरज सचिन शेळके, संदीप विश्वास शेळके, चंद्रकांत शेळके,उमेश लोहकरे,वैभव जाधव ,किरण वाकळे, भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य सुनील चौधरी, प्रा.अमोल वैद्य तसेच विद्यालयातील व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,चाॅंदसूरज गावचे ग्रामस्थ व महिला तसेच चास गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन सुनील शेळके यांनी व आभार प्रदर्शन संदीप जाधव यांनी केले.