इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२२/०५/२०२३

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ ०१ शके १९४५
दिनांक :- २२/०५/२०२३,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५७,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति २३:२०,
नक्षत्र :- मृग समाप्ति १०:३७,
योग :- धृति समाप्ति १६:३३,
करण :- तैतिल समाप्ति १०:४१,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – कृत्तिका,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:३३ ते ०९:१० पर्यंत,

लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०५:५५ ते ०७:३३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:१० ते १०:४८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:४१ ते ०५:१९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:१९ ते ०६:५७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भा. ज्येष्ठ मासारंभ, रंभाव्रत, अमृत १०:३७ प.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ ०१ शके १९४५
दिनांक = २२/०५/२०२३
वार = इंदुवासरे(सोमवार)

मेष
व्यवसाय व्यापारातील जागेचा प्रश्न मिटेल. व्यवसायातील पत वाढेल. मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याकडून मदत मिळेल. वारसा अधिकार मिळेल. विमामुळे लाभ होतील. घर प्रापर्टी खरेदी अचानक घडेल. दूरचे प्रवास घडणार आहेत. नोकरी व्यवसायानिमिल परदेश प्रवास होतील. नोकरीत नवीन जबाबदारी पार पाडाल. दिवसभर मन प्रसन्न राहील. लेखन कला क्षेत्रातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. मातेच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या.

वृषभ
मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल. स्वसंपादीत धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभदिवस आहे. स्वता:ला सिद्ध कराल. मित्रांकडून मदत मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात यश येईल. अपयशाची भिती न बाळगता कष्ट करत राहा.

मिथुन
नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्र नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे. आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल. नव्या खरेदीने कुटुंबात आंनदी वातावरण राहील.

कर्क
प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नवीन व्यक्तीशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. आपल्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळेल. मनातील इच्छित काम मार्गी लागतील. शुभ संदेश मिळतील. घरात आप्तेष्ट नातेवाईकांचे आगमन होईल. आत्मसन्मान वाढेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रकल्प हाती येतील. संशोधन पर अभ्यासाच्या प्रारंभास आजचा दिवस उत्तम आहे. मनात प्रसन्नता असेल. मित्र मैत्रिणीकडून सहकार्य लागेल. प्रसन्नता पूर्वक दिवस आहे.

सिंह
ताणतणाव जाणवेल. कौटुंबिक खर्च वाढेल. आर्थिक व्यवहार अत्यंत सावधानीपूर्वक करावेत. जामीन राहू नका. बँकेतून कर्ज घेणे टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. काहीसा अडचणीत आणणारे दिनमान राहील. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. मोठे धाडसी निर्णय घेऊ नयेत. मित्रमैत्रिणींबरोबर व्यवहार करताना जपून करा. अनिद्रेचा त्रास होऊ शकतो.  मन अस्वस्थ राहील. प्रकृतीवर लक्ष द्या.

कन्या
धरसोड मनोवृत्ती सोडा. ध्येय निश्चित करा. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नवीन कल्पना आमलात आणा. क्रिएटिव्ह मंडळीसाठी आजचा दिवस स्पेशल आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तीकरिता आज शुभ योग आहे.  शासकीय योजना आणल्या जातील. रखडलेले प्रकल्प पुर्णत्वास जातील. शेअर बाजार मधील कामासाठी शुभ दिवस आहे. आपल्या हातून शुभ कार्य घडतील. स्त्रीयाकडून विशेष लाभ होईल. लाभदायक दिनमान असेल.

तुला
नोकरी व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. काहींना नोकरीत प्रमोशन मिळेल. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या आणि मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. भावडांशी चांगले संबंध राहतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभणार आहे. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. नातेवाईकाकडून सहकार्य लाभेल.

वृश्चिक
सर्वच बाबतीत समाधान लाभेल. मनाप्रमाणे घटना घडतील. आध्यात्मिक देवधर्म यावर श्रद्धा वाढेल. मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. नोकरदारांना नोकरीत उत्कृष्ट प्रस्ताव येतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. व्यवसायात उत्तम लाभ होतील. घरातील आनंदी वातावरण मानसिक सौख्य देणारे असेल. व्यापार व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. शासकीय कामकाजात शुभ दिवस आहे. उपासना व आध्यात्माची आवड निर्माण होतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह लाभेल.

धनु
बोलघेवडेपणा शक्यतो टाळा. अन्यथा आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी विरोध मतं निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल, असी स्थिती आहे. व्यापारी वर्गांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. शक्यतो आज प्रवास टाळावा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. अपप्रवृत्तींवर नियंत्रण ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्या. चिंता वाढविणारा दिवस असून मनावर नियंत्रण ठेवून आज वाटचाल करा.

मकर
व्यवसायात वाढ होईल मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्र किवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. संततीच्या महत्वाच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. घरातील अडचणी दूर होतील. पत्नी नोकरीत असेल तर प्रमोशन बढतीचे योग आहेत. आंनदायक वातावरण राहील. आरोग्याबाबतीत विशेष लक्ष द्यावे.

कुंभ
खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंताही वाढेल. रोजगारात जबाबदारीनुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंदयात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानदायक ठरतील. क्षणिक फायदा पाहून अविचारी गुंतवणूक करू नका. विचार पूर्वक निर्णय घ्या. प्रकृती आस्थिर व बैचेन राहील. आर्थिक हानी नुकसान फसवणूक होण्याची शक्यता आहे. व्यवहार काळजीने गुप्तशत्रुपासुन त्रास जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या.

मीन
आपली प्रतिभा उंचावेल. दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. नोकरीत कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढणार आहे. गृहसौख्य पत्नीकडून सहकार्यामुळे मनोबल उंचावलेले असेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button