इतर

चिचोंडी येथे पारंपारिक पशुऔषधी कार्यशाळा सम्पन्न

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यात अलेईमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या आर्थिक मदतीने आणि बायक लाईलीव्हुड महाराष्ट्र यांच्या तांत्रिक सहकार्याने जीविधा प्रकल्प कार्यान्वित असून या प्रकल्पांतर्गत चिचोंडी येथे पारंपारिक पशुऔषधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेत पारंपारिक वनस्पतींचा जनावरांसाठी होणारा उपयोग,औषधी वनस्पतींची ओळख आणि त्यापासून औषध निर्मिती याबाबत  श्री निंबाळकर यांनी  मार्गदर्शन केले

 डॉ. शेख यांनी जनावरांना होणाऱ्या आजारांची ओळख व प्राथमिक उपचार तसेच डांगी गाई संवर्धनातील अडचणी यावर मार्गदर्शन केले. 

या कार्यशाळेला बायफच्या उरळी कांचन मध्यवर्ती संशोधन केंद्र येथील वरिष्ठ अधिकारी श्री. सदाशिव निंबाळकर, वरिष्ठ संशोधन अधिकारी श्री. दीपक पाटील बायफ नाशिक पशुधन विभागाचे तांत्रिक कार्यक्रम विकास अधिकारी डॉ‌. समृद्धीन शेख, ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरण पुरस्कर्ते श्री रामलाल हासे, चिचोंडी च्या लोकनियुक्त सरपंच सौ. कविता मधे , तुकाराम भोरू गभाले, विष्णू चोखंडे, किरण आव्हाड, गोरक्षनाथ देशमुख, प्रतीक भोर उपस्थित होते. 

या कार्यशाळेमध्ये देवगाव, शेणीत, टिटवी, मान्हेरे, पांजरे, बारी, जहागीरदारवाडी आणी पेंडसेशेत येथील वैद्य आणि डांगी संवर्धक पशुपालक सहभागी झाले होते. 

या कार्यशाळेचे आयोजन बायफचे प्रकल्प समन्वयक श्री. योगेश नवले यांनी केले. याप्रसंगी बाळू घोडे, रामकृष्ण भांगरे, आनंदा गोलवड, सचिन येलमामे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री योगेश नवले यांनी केले तर श्री विष्णू चोखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पारंपारिक पशु औषधांचा प्रचार आणि प्रसार हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. स्थानिक वैद्यांचे ज्ञान जतन करून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीला चालना देणे गरजेचे आहे. या कार्यशाळेत मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक पातळीवर एथनो व्हेटर्नरी मेडिसिन हाब तयार करण्यात येणार आहेत. 

————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button