इतर

व्यवसायिक शिक्षण काळाची गरज – मोनिकाताई राजळे


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
नव्या पिढीला परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पावले ओळखून नावीन्य पूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे, देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे. त्यामुळे युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर चे माध्यमातून युवक युवतींना मार्गदर्शन करण्यात येत आहे. बदलत्या काळानुसार युवा पिढीला कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे, शिबिराच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या योजनाची एकत्रित माहिती विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मिळेल. बार्टी, सारथी, महाज्योती या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिले जातात, आगामी काळात व्यावसायिक क्षेत्रात मोठे रोजगार उपलब्ध होणार असून आपल्या शेजारील छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर येथील एमआयडीसीत नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत करिता विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षण घेतले पाहिजे असे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाचे कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग अंतर्गत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराला शुभारंभ प्रसंगी आमदार मोनिकाताई राजळे बोलत होत्या यावेळी नायब तहसीलदार रवींद्र सानप, निशांत सूर्यवंशी, आयुक्त, कौ. वि.रो.व उ. अहमदनगर, दिनेश चव्हाण जिल्हा व्यवस्थापक ओबीसी महामंडळ, उद्योजक सचिन गोमासे, उद्योजक दत्तप्रसाद कराळे, व्याख्याते ज्ञानेश्वर अनावडे, गणेश मोरे, प्रा. अर्जुन देशमुख, कैलास वाघमारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेवगावचे प्राचार्य उमेश पालवे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथर्डी चे प्राचार्य अजय वाघ तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते, शिबिरासाठी युवकांची मोठी संख्या होती, यावेळी 860 मुलांनी शिबिरासाठी रजिस्ट्रेशन केले.
यावेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत, बदलत्या काळानुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल होत आहेत, मागणी करणाऱ्याला काय अपेक्षित आहे हे या शिबिरातून कळते, शासनाचा या शिबिरामागचा हेतू आहे. आजच्या शिबिरासाठी युवकांनी मोठा प्रतिसाद दिला याबद्दल त्यांचे नक्कीच कौतुक आहे, या शिबिराच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार तसेच स्वयंरोजगार मिळेल अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेवगाव व पाथर्डी येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील तसेच दोन्ही औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात नवीन अभ्यासक्रम शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात येतील असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे यांनी केले तर आभार औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेवगावचे प्राचार्य उमेश पालवे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सदावर्ते यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button