सुपा एमआयडीसी मधील गणराज कंपनी कडून धुराचे प्रदूषण !

दत्ता ठुबे
पारनेर:-सुपा एमआयडीसी मध्ये गणराज इम्पॅक्ट प्रायव्हेट लिमीटेड ही कंपनी वाघुंडे खुर्द हद्दीत रस्त्यालगत आहे. या कंपनीचा धूर प्रचंड प्रमाणात घातक असून त्या धुरातून खूप घातक बर अणि खाक बाहेर पडते.रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांतील प्रवाशी आणि शेजारील हॉटेल वरील अन्नावर ती बसते अाणि हे अन्न खाल्यावर शरीरावर घातक परिणाम होतो. कंपनीच्या बाजूला रोडच्या लगत शेती असल्याने शेतकऱ्यांच्या शेती मालावर तसेच फळबागांवर त्या धुराची खाक व बर बसते व त्यामुळे शेतकऱ्यांची पिके आणि फळबागांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सदर कंपनी ही नगर पुणे रस्त्यालगत असल्यामुळे प्रवाशांचे व तेथील व्यावसायिकांचे खूप नुकसान होत आहे. सदर कंपनीचा घातक धूर रात्री हवेत सोडतात.
सदर कंपनी ही रस्त्यालगत न राहता ही कंपनी आऊट साइडला स्थलांतरित करावी जेणेकरून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना त्याचा त्रास होता कामा नये यासाठी अगोदरही प्रशासनाला निवेदन देवून आंदोलनाचा ईशारा दिला होता परंतु त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही.त्यामुळे आज दि.२३ रोजी पुन्हा तक्रारी निवेदन महाराष्ट्र प्रदूषण विभागाचे अधिकारी शिंदे साहेबांना देण्यात आले. सदर कंपनीवर काय कारवाई करण्यात आली याबाबत आम्हाला एक महिन्यात कळवावे,तसे न झाल्यास आम्ही आपल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा परीसरातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या पाठींब्यासह दिला. या पुढे निवेदन नाही तर मनसे स्टाईल कार्यक्रम करू असे रविश रासकर यांनी सांगितले.