सुपा चौपदरीकरणासह नगर-पुणे महामार्गाच्या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात मनसेचा ठिय्या

दत्ता ठुबे
पारनेर:-नगर-पुणे महामार्गावर १३ वर्षे टोल वसुल करणारी कंपनी मुलभुत व बंधनकारक सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे त्यामुळे अपुर्ण व निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे नगर-पुणे महामार्गावर सतत अपघात ,वाहतुक कोंडी होऊन शाळकरी मुलं ज्येष्ठ नागरिकांचे अपघात होऊन अनेक निरपराध नागरिकांना आपला जिव गमवावा लागला आहे व लागत आहे अनेक निरपराध नागरिकांना अपंगत्व प्राप्त झाले आहे या सर्व गोष्टीचा विचार करुन संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी पञ व्यवहार केला असुन संबंधित अधिकारी वर्ग गांभीर्याने घेत नसल्याने जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या दालनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अचानक ठिय्या आंदोलन करण्यात आले.जो पर्यंत संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन म्हसणे फाटा टोलनाका बंद करण्यात येणार नाही तोपर्यंत जिल्हा अधिकारी याच्या दालनात बसणार अशी आक्रमक भुमिका घेतली असता उप जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सकारात्मक चर्चा करत संबंधित अधिकारी व कंपनी वर कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनामुळे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले व त्यांनी संबंधित टोलनाका बंद केला नाही तर परत पंधरा दिवसांनी अशाच प्रकारे कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता जिल्हा अधिकारी यांच्या दालणात बसणार असल्याचे मनसे माथाडी कामगार सेना अहमदनगर जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
नगर-पुणे महामार्ग अपघातमुक्त होत नाही तो पर्यंत शांत बसणार नाही- अविनाश पवार मनसे नेते
नगर -पुणे महामार्गांवर अपघातांची चाललेली जीवघेणी मालिका हे प्रशासनाचे नाकर्तेपणाचे लक्षण आहे वेळोवेळी विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासणाचे लक्ष मनसेच्या वतीने करण्यात आले परंतु महामार्गावर अनेक परीवार अर्धवट व निकृष्ठ दर्जांच्या कामामुळे उघड्यावर आले त्यामुळे न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या दालनात बसावे लागले त्यामुळे जिल्हाधिका-यांनी दखल घेतली परंतु काम सुरु होत नाही तोपर्यंत लढत राहणार कुणाच रक्त रस्त्यावर सांडू देणार नाही– मनसे नेते अविनाश पवार