अहमदनगर

शेवगाव येथील चंद्रकांत लबडे यांना राज्यस्तरीय यशस्वी उद्योजक पुरस्कार प्रदान


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव येथील शनैश्वर झेंडे & बॅग हाऊस (झेंडे मॅन्युफॅक्चरिंग) चे सर्वेसर्वा मराठा भुषण चंद्रकांत महाराज लबडे यांना मराठा उद्योजक लाॅबी च्या वतीने यशस्वी उद्योजक पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार व लाईफ लाईन उद्योग समूहाचे संस्थापक नवनाथ धुमाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लबडे महाराजांनी झेंडे व्यवसायात 5 वर्षे पुर्वी पदार्पण केले होते आज त्यांनी बनवलेले झेंडे उत्कृष्ट कॉलिटी व माफक दरामुळे पुर्ण महाराष्ट्रात देशात व विदेशातही जातात. लबडे महाराजांची प्रेरणा घेऊन अनेक बेरोजगार तरुण व्यवसायामध्ये उतरावे असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी उद्योजक लॉबीच्या सेमिनार व पुरस्कार सोहळ्यामध्ये काढले. राजेंद्र औताडे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुदत्त लॉन अ. नगर येथे बुधवार 2 फेब्रुवारी रोजी भव्य असा मराठा उद्योजक सेमिनार, गुणवंत, यशस्वी उद्योजक पुरस्कार सोहळा पार पडला. मराठा तरुणांनी आवडते क्षेत्र निवडून व्यवसाय निवडला पाहिजे व शेवटपर्यंत जिद्द चिकाटीने काम केले तर यशस्वी होतील असे बहुमोल मार्गदर्शन लाइफ लाइन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री एन बी धुमाळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी मा. पोपटराव पवार मा.नवनाथ धुमाळ, चंद्रकांत गाडे, सुरेश इथापे,लाॅबी चे संस्थापक अध्यक्ष विनोद बडे, डॉ. अविनाश मोरे, राजेंद्र काळे व लॉबीचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते.
अशोक कुटे यांनी प्रास्ताविकात लॉबीचे कार्य पटवून देवून कार्यक्रमाचा उद्देश, रूपरेषा व भविष्यातील नियोजन सांगितलं.
शहराध्यक्ष महेश आठरे, प्रकाश इथापे, जालिंदर वाळके, आजिनाथ मोकाटे, गणेश दळवी, अभय शेंडगे संदीप खरमाळे ,प्रमोद झावरे व इतरांनी कार्यक्रमाचे फार छान नियोजन केल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. संपूर्ण राज्यातून लॉबीचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.
आत्तापर्यंत लबडे महाराजांनी शेवगाव मध्ये तिन वर्षांपासून अखंड पणे एकशे चौतीस वेळा दर शुक्रवारी शिव अभिषेक घडवून आणला आहे. या बद्दल ही सर्वांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी लबडे म्हणाले हा पुरस्कार माझ्या समाज बांधवांना व ग्राहकांना समर्पित करतो त्यांच्या मुळेच मी पुरस्कारासाठी पात्र ठरलो.लबडे महाराज यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे निवडीचे अभिनंदन छत्रपती संभाजी महाराज भोसले, आ. नरेंद्र पाटील, आ.विनायक मेटे, विनोद पाटील, स्वाभिमानी मराठा महासंघ चे संस्थापक डाॅ कृषीराज टकले, संभाजीराजे दहातोंडे, शब्दगंध साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष शहारामआगळे,अंकुश डांभे, सुभाष गागरे आदिनी अभिंनदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button