आमदार लंके यांच्या हस्ते पळवे खुर्द येथे पाझर तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील स्मशानभूमी लगत असणाऱ्या पाझर तलावाच्या दुरुस्तीस नुकताच प्रारंभ झाला आहे. पारनेर नगर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निलेश लंके तसेच पळवे खुर्द येथील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील तसेच पारनेर मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपण विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करून आणला असून विविध ठिकाणी मतदारसंघात विकास कामे चालू आहेत. मृद व जलसंधारण विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ आ. निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.या कामासाठी आमदार लंके यांच्या प्रयत्नातून 7 लाख 76 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे व कामासही सुरुवात झाली आहे. याप्रसंगी उपस्थित गावचे सैनिक बँक संचालक संजय तरटे, सरपंच सरिता जगताप, माजी सरपंच रामदास आबा तरटे, उपसरपंच अमोल जाधव, हंगा गावचे सरपंच राजेंद्र शिंदे, रवींद्र नवले, तात्यासाहेब देशमुख, दत्ता दिवटे, सुरेश भाऊ कळमकर, प्रसाद तरटे, दत्तात्रय गाडीलकर, अमोल शेळके, राजेंद्र शेलार, कविता गाडीलकर, गणेश इरकर, अंबादास तरटे,विनायक पवार, दत्ता जगताप,भाऊसाहेब जाधव, संतोष तरटे,संजय झराड, बाळासाहेब शेळके,राजेंद्र पाचारणे, मधुकर गाडीलकर, अमोल तरटे, गणपत जगताप, विजय जगताप आदी उपस्थित होते. गावाला भरून निधी दिल्याबद्दल आमदार निलेशजी लंके व राणीताई लंके यांचे गावच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.