इतर

चक्रवती सम्राट आद्यकवी रामायणकार आदिवासी महर्षी वाल्मिकी सत्यकथा-प्रा. मोतीलाल सोनवणे

शिर्डी प्रतिनिधी :

( संजय महाजन )

 आदिवासी महर्षी वाल्मिकी उत्तर कोशलचा आदिवासींचा राजा होता. आदिपुरुष ब्रह्मदेव त्याचा पुत्र स्वयंभू मनु,मनूचा पुत्र प्रचतेस, या आदिवासी कोळ्याच्या दहावा पुत्र वाल्मिकी आहे. हिंदुस्थानचा वायव्य सरहद्दीवरून आलेल्या आर्यांशी महर्षी वाल्मिकींचे घनघोर युद्ध झाले. वाल्मिकी मुळे शत्रु सैन्याचे सात औक्षनी सैनिक मारले. त्याची मोजणी त्याने सात रांजण भरून केली.या रक्तपाताला कंटाळून त्याने पुत्र दाक्षला राज्यावर बसून ते वनात निघून गेले.तामसा नदीचा काठावर आश्रम स्थापन केला.हजारो वर्षे तपश्चर्या केली. वाल्मिकी युद्धकलेत निपुण होता. अद्वितीय योद्धा होता.श्रीराम पुत्र लव- कुश यांना महर्षी वाल्मिकींनी युद्धकलेत तरबेज केले.एके दिवशी भारद्वाज सोबत तामसा नदीवर स्नानासाठी जात असताना एका वृक्षावर कामातूर झालेल्या पक्षाच्या जोडप्यांपैकी नराला एका व्याधाने बाण मारला.त्याची मादी त्याचे भोवती विलाप करू लागली. महर्षी वाल्मिकीचे मन कळवळले.  पक्षाचा तू वध केलास तू फार काळ जगणार नाहीस! हि शापवाणी खरी ठरली.ब्रह्मदेवाने स्वतःहून सांगितले तुझ्या ठिकाणी सरस्वती अवतरली आहे.तू रामचरित्र लिही.जोपर्यंत भूतलावर पर्वत,नद्या आहेत.तोपर्यंत तुझी ही रमणीय राम कथा लोकांमध्ये अमर होऊन राहील.वाल्मिकीने राम जन्मापूर्वीच रामायण लिहिले. आदिवासी महर्षी वाल्मिकी सदाचार संपन्न होते.दर्शन झाले असता लोकांना आनंद देणारे होते.युद्ध काळी क्रुद्ध झाला असता देवांनाही भीती उत्पन्न करणारे होते.लवकुश यांचे आदर्श गुरू होते.अद्वितीय महायोद्धा,महातपस्वी, सत्यवचनी होते असे आदिवासींचे राजा होते.(ते चोर, दरोडेखोर, डाकू नव्हते तर आदिवासींना बदनाम करण्याचे,रचलेले एक षड्यंत्र आहे.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button