
—
पारनेर प्रतिनिधी,
तालुक्यात धार्मिक दृष्टया संवेदनशील समजल्या जाणाऱ्या काकनेवाडी येथे भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी.वै बबन महाराज पायमोडे, वैराग्यमूर्ती डॉ नारायण महाराज जाधव व कृष्ण कृपकित डॉ मिसाळ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरीनाम साप्ताहचे आयोजन पवित्र श्रावण मासात करण्यात आल्याची माहिती हभप. दादाभाऊ महाराज वाळुंज यांनी दिली.
सप्ताहचा प्रारंभ विनापूजन व श्रीच्या महाभिषेक ने होईल.
दि.12/08/2022 ते 19/08/2022 या कालावधीत प्रवचन, कीर्तन,भजन इतर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत हभप सवणे महाराज, आरणाळ महाराज, ढोरे महाराज कुलकर्णी महाराज आंबेकर महाराज दादाभाऊ महाराज, डॉ विकासानंदाजी महाराज मिसाळ यांचे कीर्तन तर काल्याचे कीर्तन हभप बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे आयोजित करण्यात आले आहे.
तसेच शेकडो वर्षांची वारकारी संप्रदाय ची परंपरा लाभलेल्या काकनेवाडी गावातील सर्व प्रवचनकारची प्रवचन सेवा आयोजित करण्यात आली आहे.कृष्णजन्मा दिवशी गावातील अविनाश पारख पद मंडळ यांच्या भेंदिक भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमास गावातील सर्व ग्रामस्थ, आणि मुंबईकर मंडळी यांचे सहकार्य लाभते.
अन्न दाणासाठी गावातील सर्व ग्रामस्थ,कीर्तन सौजण्या साठी विनायक पवार, अनिल वाळुंज, दीपक वाळुंज, भगवान शेठ वाळुंज, मारुती वाळुंज यांचे तर काल्याच्या महाप्रसाद साठी रामदास देवराम वाळुंज यांचे सहकार्य लाभले, तसेच मंडप सौजण्य शंभुराजे मित्र मंडळ, पाणी जार सौजण्य किसन वाळुंज, जनरेटर सौजण्य विनायक वाळुंज आणि टँकर सौजण्य गोरख शेठ वाळुंज यांनी दिले आहे.
तर जाहिरात सौजण्य राहुल वाळुंज आणि आकाश वाळुंज यांचे लाभले.
कोरोना काळात तरुणांनी डिजिटल सप्ताहची संकल्पना राबवून मागील वर्षी fb live आणि utube live करून ही परंपरा जपण्यात आली होती."गावातील या साप्ताहला शेकडो वर्षांची परंपरा आहे गावातील तरुण,ग्रामस्थ, आणि मुंबईकर मंडळी या सर्वांच्या सहकार्याने ही परंपरा जपली जाते याचा खूप आनंद होत आहे."
--
- जयवंत शेठ वाळुंज
(अध्यक्ष मुंबईकर मंडळ )
“