पळवे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा राजीनामा मंजूर!

राजीनामा नामंजूर करण्याचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पळवे खुर्द ग्रामपंचायतच्या सरपंच सरिता जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा राजीनामा दबावाखाली घेतलेला असल्यामुळे सदरचा राजीनामा गृहीत धरू नये यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केलेला विवाद अर्ज जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी फेटाळून लावला आहे . अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत पळवे खुर्दच्या सरपंच सरिता गणपत जगताप यांनी त्यांचा सरपंच पदाचा राजीनामा तत्कालीन पंचायत समितीचे सभापती तथा प्रशासक यांच्याकडे सुपूर्द केला होता दरम्यानच्या काळात सदरचा राजीनामा त्यांनी स्वतः संमतीने अक्कल हुशारीने दिलेला नसल्याबाबत तक्रार करून राजीनाम्यावरील सही दबावाखाली घेतली असल्याची तक्रारी केलेल्या होत्या दरम्यान सदरचा राजीनामा हा ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत मांडण्यात आला व तो मंजूर देखील करण्यात आला त्यामुळे सदरील सरपंच सरिता जगताप यांनी जिल्हाधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ यांचेकडे विवाद अर्ज दाखल करून सदरील राजीनामा हा राजकीय दबावाखाली व दडपणाखाली घेतलेला असल्यामुळे सदरचा राजीनामा नामंजूर करण्यात यावा अशी विनंती केलेली होती मात्र सदरील विवाद अर्जामध्ये सदरील राजीनामा वरील साक्षीदार कविता नानाभाऊ गाडीलकर व अमोल बाळू जाधव यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे समोर हजर होऊन एडवोकेट गोरक्ष पालवे यांच्या मार्फत लेखी म्हणणे व हस्तक्षेप अर्ज सादर करून सदरील राजीनामा आमच्या समक्ष सरिता जगताप यांनी दिलेला असून तो राजीनामा त्यांनी स्वतः दिलेला असल्यामुळे मंजूर करण्यात यावा अशी विनंती केलेली होती,दरम्यान जिल्हाधिकारी यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून कागदपत्राची पाहणी करून निर्णय जाहीर केला असून सदरील न्याय निर्णयाप्रमाणे सरिता गणपत जगताप यांनी दिलेला राजीनामा हा कायद्यातील तरतुदीप्रमाणे असल्यामुळे त्यांचा राजीनामा रद्द करावा असा आग्रह अमान्य करून त्यांचा विवाद अर्ज नामंजूर केलेला आहे त्यामुळे त्यांना पळवे खुर्दच्या सरपंच पदावरून पाय उतार व्हावे लागणार आहे.सदरील विवादांमध्ये हरकतदार व राजीनाम्यावरील साक्षीदार कविता गाडीलकर व अमोल जाधव यांचे वतीने एडवोकेट गोरक्ष पालवे यांनी कामकाज पाहिले.त्यांना एडवोकेट रोहित बुधवंत,राजेश खळेकर, गुरविंदर पंजाबी,धनश्री खेतमाळीस,बाळकृष्ण गीते, राहुल अंबरीत यांनी सहाय्य केले.
