इतर

शेवगाव सायकल कल्ब कडून भागधारक काटे यांचा सन्मान


शहाराम आगळे
शेवगाव तालुक प्रतिनिधी

  शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात औषध निर्माण अधिकारी म्हणून प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.त्याचा शेवगाव सायकल कल्बचे अध्यक्ष विनोद ठाणगे व समन्वयक डॉ . संदीप बोडखे यांनी सत्कार केला.यावेळी बोलताना शेवगाव सायकल कल्बचे सदस्य कैलास जाधव म्हणाले भागनाथ काटे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवा काळात अनेक गरजवंताना प्रामाणिकपणे आरोग्य सेवा दिली.त्यांना आरोग्य सेवेबद्दल सन 2018 सारी राज्यस्तरीय उत्कृष्ट औषधं निर्माण अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.आरोग्य व सामाजिक क्षेत्रात त्याचे काम कौतुकास्पद आहे.शेवगाव रोटरी कल्बचे 2017/2018साली अध्यक्ष होते.त्याच्या कार्यकाळात शेवगाव बसस्थानकावर प्रवाशांना पाणी पिण्यासाठी पाणपोईची व्यवस्था तसेच नको असलेले ठेवा पाहिजे असलेले घेऊन जा उपक्रम राबविला.शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिरसाट वाडी येथील मुक बधीर शाळेत कपडे वाटप,वरून येथे भाविकांना खिचडी वाटप, सर्व रोगनिदान शिबिर,दिवाळी निमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले.मराठा सेवा पतसंस्थेच्या सहसचिव, संचालक म्हणून काम केले.ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका, ग्रंथालय शुभम मंगल कार्यालय येथे चालवतात.या त्यांच्या का कार्याबद्दल त्यांना नेशन बिल्डर म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आली ते शेवगाव सायकल कल्बचे सदस्य असल्याने त्यांचा सेवा निवृत्ती बद्दल सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर प्रदीप उगले ,डॉक्टर दिपकवैद्य डॉक्टर  मुकुंद दारकुंडे  डॉक्टर श्रीकांत देवढे, सचिन मुळे बंडोपंत दहातोंडे हे उपस्थित होते. पोलीस कॉन्स्टेबल संजय बडे ,आबासाहेब नेमाने  सुभाष पवार यांनी  शेवगाव आळंदी , जेजुरी, तुळापूर सायकल वारी केली त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी रॉयल रायडर्स नाशिक यांनी आयोजित एप्रिल 2023 सायकलिंग चॅलेंज ही स्पर्धा सायकल क्लबचे डॉक्टर संदीप बोडखे ,डॉक्टर योगेश फुंदे .डॉक्टर जगदीश कुलकर्णी निलेश केवळ .,विनोद ठाणगे ,.सुनील गवळी वसंत सुरवसे या सायकल पटूनी ,यशस्वीरित्या पूर्ण केली त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला एप्रिल महिन्यामध्ये दररोज 25 किलोमीटर सायकल चालवायची अशी ही स्पर्धा होती.प्रा.राम नेव्हल,प्रा. लक्ष्मण बिटाळ, संतोष भागवत निळकंठ लबडे, प्रदीप बोडखे, बाळासाहेब देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button