इतर

पळवे खुर्द येथे मंडळ अधिकारी कार्यालय सुरू आमदार निलेश लंके यांच्या हस्ते उदघाटन

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी : मंडळ अधिकारी कार्यालय हे वाडेगव्हाण येथे असल्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेत हे कार्यालय जवळ असण्यासाठी अनेकांनी याचा पाठपुरावा केला होता. त्यामध्ये प्रामुख्याने माहिती सेवा समितीचे पदाधिकारी यांच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये भजन व टाळे ठोक आंदोलन केले होते. त्यावेळी या कार्यालयाला मंजुरी भेटली होती परंतु जागे अभावी विलंब झाला होता. आता यासाठी पळवे खुर्द येथे जागा उपलब्ध झाली असून हे कार्यालय पळवे खुर्द येथे सुरू करण्याचे ठरवले व उद्घाटन करून ते सुरूही झाले आहे. आता या कार्यालयामध्ये जवळपास १४ गावांचा संपर्क जोडला गेला आहे. आता आपल्या शेती संदर्भात कामासाठी वाडेगव्हाणला जाण्याची गरज नाही असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष विक्रम सिंह कळमकर, सैनिक बँक संचालक संजय तरटे,सचिन पठारे श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष,वाळवणे,मुंगशी गावचे सरपंच अनिल करपे,माजी सरपंच रामदास आबा तरटे, माजी सरपंच नानाभाऊ गाडील कर, माजी उपसरपंच संजय नवले, उपसरपंच अमोल जाधव, माजी उपसरपंच तात्या भाऊ देशमुख, माजी चेअरमन रोहिदास नवले, तात्या भाऊ शेळके,पोपटराव तरटे, उद्योजक रवींद्र नवले, हरिभाऊ भंडलकर, पोलीस पाटील संभाजी पाचारणे, दत्ता गाडीलकर, डोमे भाऊसाहेब, नियुक्त सर्कल एस.एस.जेठे , तलाठी प्रकाश शिरसाट, प्रसाद तरटे,अमोल शेळके, अंबादास तरटे, अमोल तरटे, तसेच पळवे खुर्द व पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button