अकोले येथील खरेदी विक्री दस्त नोंदणी निबंधक कार्यालयात जनतेची आर्थिक लुट !

अकोले प्रतिनिधी
अकोले येथील खरेदी विक्री दस्त नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात जनतेची लुट होत आहे
जमीन खरेदी-विक्रीपासून, भाडेकरार, जुने दस्त मिळविणो या असंख्य कामांकरिता दुय्यम निबंधक कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांकडून दररोज लाखो रुपयांचा मलिदा उघड-उघड पणे घेतला जात आहे ., मोठय़ा जोखमीच्या आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये काही त्रुटी काढून आपल्याला त्रास दिला जाईल, या भीतीपोटी तक्रार करायला कुणीच धजावत नसल्याने या लाचखोरांचे चांगलेच फावत चालले आहे.
अकोले शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमार्फत खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पाडले जातात. या व्यवहारांमधून शासनाला दररोज लाखो रुपयांचा महसूल मिळतो; त्याचबरोबर येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही खिसे चांगलेच भरले जात आहेत. कार्यालयांबाहेर कार्यरत असलेले त्यांचे निवडक एजंटांकडून या ठिकाणी आर्थिक व्यवहार केला जातो
एका तक्रारदाराने ने सांगितले, की दुय्यम निबंधक कार्यालयात होणाऱ्या प्रत्येक खरेदी-विक्रीच्या व्यवहारात किमान हजार रुपये अधिकारी लिपिकांना द्यावे लागतात. गुंठेवारीनुसार जमिनीची खरेदी असेल, तर प्रत्येक गुंठय़ामागे 2 हजार रुपये घेतले जातात. कागदपत्रंची गुंतागुंत असेल, तर तो व्यवहार कितीचा आहे त्यानुसार अधिकाऱ्याच्या लाचेची रक्कम ठरते. बेकायदेशीर कामे करून देण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या लाचेची रक्कम तर खूपच प्रचंड आहे. तर त्यांना लाच न देता गुंतागुंतीची काम करणो शक्यच नाही, कारण पुन्हा काम घेऊन त्यांच्याकडे जायचे असते. त्या वेळी ते याचा वचपा काढणार हे गृहीत असते. त्यामुळे त्यांना पैसे द्यावेच लागतात.
तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पै-पै जमा करून घर तसेच जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत असतात. इथल्या लाचखोरांना विरोध केला, तर कागदपत्रंमध्ये त्रुटी काढून आपल्याला नाहक त्रास देतील, या भीतीपोटी कुणी त्यांच्याविरुद्ध तक्रार करायला धजावत नाही.. यामुळे या कार्यात येणारे लोक या बेकायदेशीर प्रक्रियेचे गुलाम बनत आहे..
दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या वकिलांना दररोजच त्यांच्याकडे काम घेऊन जायचे असते; त्यामुळे त्यांच्या वाटेला जाण्याचे ते टाळतात. यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचखोरी चांगलीच फोफावली आहे.
या कार्यालयात सि सी टिव्ही कॅमेरा बसविण्यात यावा
कंत्राटी कामगारांच्या बदल्या करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे
सदर प्रकार वेळीच बंद न झाल्यास. व तातडिने सर्वसामान्य नागरिकांची होणारी लूटमार न थांबल्यास. दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाच्या निषेधार्थ. दुय्यम निबंधक कार्यालयाच्या समोर उपोषणास बसण्याचा इशारा . . दलित मित्र प्रकाश साळवे यांनी दिला आहे…..
—— ———-