नेवासा आगारातील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी यांचा माजी मंत्री गडाख यांचे हस्ते सत्कार

सोनई — ( विजय खंडागळे )आज राज्य परिवहन मडळाच्या बसेस भरलेल्या दिसत नसल्या तरी आजही गोरगरीबा पासून ते मध्यम वर्गीय जनतेला बिनतोड़ सेवा देणारी एकमेव राज्य परिवहन एस टी महामंडळ ही आशिया खंडात नोद ठरली आहे,असे प्रतिपादन माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांनी केले,
ते एस. टी. महामंडाळातील सेवानिवृत झालेल्या कर्मचारी यांना निरोप समारंभप्रसंगी आ. गडाख बोलत होते.
अध्यक्षस्थानी अधिकारी दिनकर लीपाने हे होते.
कांगोणी येथील रहिवासी वाहक रामभाऊ कराळे, सुभाष नवले, मच्छीद्र गवळी, व केशव साळुंके,हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामडळ नेवासा आगार इथे प्रदीर्घ सेवेनतर नुकतेच सेवानिवृत झाले.त्या प्रसंगी आ. गडाख यांच्या हस्ते आयोजित केलेल्या डिपो कार्यशाळेत सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नेवासा आगार यांच्या वतीने आगार व्यवस्थापक रामनाथ मगर, मुळा बैंकचे अध्यक्ष माणिक होंडे, व व्हा. चेअरमन भाऊसाहेब निमसे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान टॉपी, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना रामभाऊ कराळे म्हणाले, मला जनतेची सेवा, व प्रामाणिक जिद्दीने काम करण्याची संधी मिळाली, हे माझ भाग्य असल्याचे सांगितले.
या प्रसंगी ह. भ. प. उद्धव महाराज,जेष्ट कार्यकर्ते नामदेव खंडागळे, देवीदास साळूके,अनिल ताके,वासुदेव आव्हाड़, राकेश सोनवणे, कैलास म्हस्के,गणपत सोनवणे, अशोक आदिक, प्रचार्य गोरखक्षनाथ कल्हापुरे,जालिन्दर रौंदळ,बबन वाल्हेकर, प्रा. अशोक सोनवणे, रतन हरकल,रमेश आदिक, मयूरी हाडके,विजय सिकची व प्रसाद परदेशी अदी उपस्थित होते.
—-आणि पुढील कार्यक्रम रद्द केले
मोठ्या आग्रह नुसार आज तालुक्यात नियोजित बरीच कामे होती, आणि भेट देऊन शुभेच्छा देऊन जाऊ, परंतु इथे आल्यानतर मोठा कार्यक्रम पाहता, मी पुढील सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे सागताच टाळ्याच्या कड़कडात प्रतिसाद यावेळी दिला.आभार रामभाऊ कराळे यांनी मानले