दहावीच्या गुणवंतांचा जोगेश्वरी पतसंस्थेच्या वतीने सन्मान

वासुंदे विद्यालयात आलिशा झावरे प्रथम
दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील वासुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान जोगेश्वरी पतसंस्था परिवार व वासुंदे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आला.
नुकताच शुक्रवारी दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लागला.ग्रामीण भागातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविले.वासुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे
गुणवंत विद्यार्थी १) झावरे अलिशा संदीप (९२.४०%) २) खराबी अंकिता बाबाजी (९०.४०%) ३) दाते सार्थक संदीप (८८.२० %) ४) तळेकर प्रथमेश हरिभाऊ (८७.००%) ५) दाते रोहित अनिल (८६.६०%) यांनी दैप्यमान यश संपादन केले यांचा गुणगौरव संभारंभ जोगेश्वरी पतसंस्था परिवाराच्या वतीने वासुंदे येथील हनुमान मंदिर सभागृहामध्ये संपन्न झाला.
यावेळी जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे म्हणाले ग्रामीण भागामध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळणे महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण नेहमीच व त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जोगेश्वरी पतसंस्था परिवार व वासुंदे ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला आहे.
या दरम्यान चेअरमन जालिंदर वाबळे,सरपंच परिषदेचे समन्वयक बाळासाहेब पाटील, भागूजी झावरे, गजानन झावरे, पत्रकार शरद झावरे, गीताराम जगदाळे,मारुती उगले,अमोल उगले, स्वप्निल झावरे, बापूसाहेब गायखे, सुदाम शिर्के सोमनाथ राऊत, अशोक पाटोळे, जालिंदर शिंदे, शांताराम किनकर, पांडुरंग गायखे, सुरेश शिंदे, दशरथ बर्वे, प्रभाकर वाबळे, महेश झावरे, संदीप झावरे, बाबाजी दाते, प्रमिला खराबी, अनिल दाते, संतोष झावरे, बाळासाहेब साळुंके, डॉ. प्रसाद झावरे, किरण पोपळघट, सुनील साळुंके, जोगेश्वरी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक नानासाहेब ढेंबरे, दत्तात्रय बर्वे, आदी वासुंदे येथील ग्रामस्थ व जोगेश्वरी पतसंस्थेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.