इतर

कवी यशवंत घोडे फोफसंडीकर ,समाजसेवक सावळेराम डबडे कविरत्न पुरस्काराने सन्मानित.

अकोले प्रतिनिधी

नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, पुणे ३९ च्या वतीने २५ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल व काव्य लेखन स्पर्धा आणि पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड येथे नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी नारायण सुमंत हे होते.


यावेळी ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुमंत यांच्या शुभहस्ते नक्षत्रांचं देणं काव्यमंच्याचे जुन्नर शहरप्रमुख कवी यशवंत मारुती घोडे फोफसंडीकर यांना समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कविरत्न पुरस्कार २०२४ सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,फेटा, शाल,गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिदुर्गम फोफसंडी गावचे रहिवासी असून ते जि.प.प्रा.शाळा कुमशेत येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी बालसाहित्यक तयार केले आहेत.कवी लेखक आपल्या भेटीला उपक्रम राबविला आहे.
त्यांचे निसर्गपूजक,निसर्गाचे उपासक दोन काव्यसंग्रह,दहा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो.संस्थेचे आजीव सभासद आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले.

गौरव स्मृती पुरस्कार उद्योजक शिवहर मरे, चिंचवड,उद्योजक विक्रम मांढरे पुणे यांना प्रदान करण्यात आला.कुसुमाग्रस स्मृती गौरव ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,चंद्रपूर
नक्षत्र राजज्योतिष पुरस्कार वसंतराव कुलकर्णी भोसरी यांना प्रदान करण्यात आला.
१८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्यांना
मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.
नक्षत्रांचं देणं काव्यमंच कार्यकर्त्यांना नक्षत्र गौरव
पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी २५ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राज्यभरातून आलेल्या काव्यवाचनाचा बहारदार कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाचे बहरदार सूत्रसंचालन रुपाली भालेराव, कवी विकास बर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी वादळकार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कवी भाऊसाहेब आढाव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button