राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि १२/०२/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २३ शके १९४३
दिनांक :- १२/०२/२०२२,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२७,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति १६:२८,
नक्षत्र :- आर्द्रा अहोरात्र,
योग :- विष्कंभ समाप्ति २०:३९,
करण :- बव समाप्ति २९:३८,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- मकर – धनिष्ठा,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०४नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:५२ ते ११:१८ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:२६ ते ०९:५२ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:१० ते ०३:३५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारि ०३:३५ ते ०५:०१ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
जया एकादशी, रवि कुंभ २७:२७, मु. १५ महर्घ, घबाड १६:२८ नं., भद्रा १६:२८ प.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २३ शके १९४३
दिनांक = १२/०२/२०२२
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
मनाची दोलायमान अवस्था जाणवेल. तुमच्यातील ठामपणा दाखवून द्यावा. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मैत्रीचे नवीन संबंध जोडले जातील.

वृषभ
कौटुंबिक गैरसमज टाळावेत. तुमच्या मनातील आशा पल्लवित होतील. मित्रांची मदत घ्यावी लागेल. काही कामात अनाठायी अडकून पडाल. उगाच चिडचिड करू नका.

मिथुन
चंचलतेवर मात करावी. स्त्रियांच्या सानिध्यात वावराल. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात घाई करून चालणार नाही. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल.

कर्क
मानसिक चांचल्य जाणवेल. उगाच नसत्या काळज्या करत बसू नका. वाताचे त्रास संभवतात. अनाठायी चिडचिड वाढू शकते. फार हट्टीपणा करू नका.

सिंह
व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनाची विशालता दाखवाल. अंगीभूत कलेला चांगला वाव मिळेल.

कन्या
अतिविचार करणे टाळावे लागेल. बौद्धिक थकवा जाणवेल. उगाचच नसत्या गोष्टीत लक्ष घालू नका. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घ्याल.

तूळ
पत्नीच्या प्रेमळ स्वभावाचा प्रत्यय येईल. मुलांशी लहान-सहान गोष्टीवरून कुरबुर होऊ शकते. खर्चाचे भान ठेवावे लागेल. नसते साहस करतांना सारासार विचार करावा.

वृश्चिक
गोष्टींची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा. वादावादीत सहभाग नोंदवू नका. मागचा-पुढचा नीट विचार करावा. उतावीळपणे वागू नका. आपली आर्थिक कुवत लक्षात घ्यावी.

धनू
तुमचा कामातील जोम वाढेल. आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. आपलेच म्हणणे खरे कराल. विचारांना वेगळी दिशा देऊन पहावी. चटकन रागवू नका.

मकर
शांत व गंभीर विचार मांडाल. कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. वादाचा मुद्दा टाळावा. संसर्गजन्य विकार जडू शकतात.

कुंभ
सतत खटपट करत राहाल. मनात प्रबळ इच्छा जागृत होईल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. सांपत्तिक दर्जा टिकवून ठेवावा लागेल.

मीन
कामातील बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. तडफदारपणे वागणे ठेवाल. कामे जलद गतीने उरकाल. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button