पारनेरमध्ये महाविकास आघाडीला जोरदार धक्का; खरेदी विक्री संघावर भाजपा- शिंदे गटाचा झेंडा

पारनेर खरेदी विक्री संघामध्ये भाजपा- शिंदे गटाने केले सत्तांतर , सर्व जागांवर आघाडीचा धुव्वा!
दत्ता ठुबे
पारनेर:-पारनेर तालुका खरेदी विक्री संघाच्या १५ पैकी १५ जागेवर भाजप- शिंदे गटाचा झेंडा फडकला असून मोठ्या फरकाने हे उमेदवार विजयी झाले आहे. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या १५ उमेदवारांना जोरदार धक्का बसला असून पारनेर खरेदी विक्री संघामध्ये सत्तांतर झाले आहे. रविवारी दुपारी ४ वाजता मतदान संपल्यानंतर ४.३० वाजता इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालयात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.बी. वाघमोडे यांच्यासह दत्तात्रय हांडे, दत्तात्रय गुंजाळ, गंगाधर धावडे, किरण खिलारी, अशोक पाटोळे यांनी काम पाहिले.
आमदार निलेश लंके दिवसभर तळ ठोकुन होते.
पारनेर खरेदी विक्री संघाच्या रविवारी मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यासह बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे, माजी सभापती प्रशांत गायकवाड, राहुल झावरे, संचालक शंकर नगरे, गंगाराम बेलकर, दीपक लंके हे मतदान स्थळी तळ ठोकून होते. तर भाजपाचे नेते सुजित झावरे यांच्यासह तालुकाध्यक्ष सुनील थोरात, तालुकाप्रमुख विकास रोहकले, नगरसेवक युवराज पठारे, बाळासाहेब पठारे, बाबासाहेब खिलारी, पंकज कारखिले, शिवाजी खिलारी, सचिन वराळ हेही तळ ठोकुन होते.
खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनल विरुद्ध भाजप शिंदे गटाच्या जनसेवा पॅनल मध्ये सरळ सरळ लढत झाली आहे. खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीस छत्री तर भाजपा-शिवसेना शिंदे गटाला कपबशी हे चिन्ह मिळाले होते. पारनेर तालुका खरेदी विक्री संघाच्या १४ जागेसाठी रविवारी सोसायटी मतदार संघात १०० टक्के तर वैयक्तिक मतदार संघात ९६ टक्के मतदान झाले होते. खरेदी विक्री संघासाठी एकूण ३९० मतदार पैकी यामध्ये प्रामुख्याने २७४ वैयक्तिक मतदार पैकी २५५ मतदान तर ११६ सेवा संस्था मतदार संघापैकी ११६ ( १०० टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता.या निवडणुकीत वैयक्तिक मतदारसंघातील १२ मतदार मयत तर २ मतदार आजारी असल्याने येवू शकले नाही.

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघातून – भाजपा – शिंदे गटाच्या जनसेवा पॅनलचा ८ जागांवर विजयी झाले असून यामध्ये बाजीराव रामचंद्र अलभर ६९, प्रमोद बबनराव कावरे ७०, सुनील बाळू पवार ६१, संग्राम बाळासाहेब पावडे ६९, सतीश राजाराम पिंपरकर ७२, दत्तात्रय राजाराम रोकडे ६४, गंगाधर भानुदास रोहकले ६४, प्रसाद भरत शितोळे ६३ तर वैयक्तिक मतदार कपबशी औटी शैलेश संपत १२४, खिलारी रघुनाथ माधवराव १३९ ( भाजपा ), महिला मतदार संघ कपबशी ज्योती संदिप ठुबे २१६ मते, रेखा संजय २०६ ( भाजपा), जगदाळे मनिषा अच्युतराव १६४, नाईकवाडी नर्मदा अशोक १४६ ( पराभूत), इतर मागास प्रवर्ग शिंदे अण्णा बबन २१० ( विजयी भाजपा), भटक्या विमुक्त जाती जमाती मेचे भाऊसाहेब महादु २०० ( विजयी भाजपा), अजित नामदेव सांगळे १६९ मते मिळाली आहेत. हा निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी पारनेर शहरात गुलाल उधळत फटाके फोडत डिजे मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला आहे.