राजूर येथे वटपौर्णिमा उत्सवात साजरी

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
आज राजूर मध्ये वडाची पूजा करण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली होती.हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.पूजेसाठी .वडा सारखं मोठ आयुष्य आपल्या पतीला मिळव या साठी महिला वडाची पूजा करतात विविध सण व उत्सव एकोप्याने उत्साहाने आनंदाने साजरी केली जातात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करता.वडायचे पारंब्याचा विस्तारही खूप मोठा होतो.या दिवशी स्त्रिया वटसावित्री व्रत करतात. आपले पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घ आयुष्य प्राप्त होवे या साठी पार्थना करतात सौभाग्य चे प्रतीक मानले जाणारे हळदीकुंकू काळी पोत हिरव्या बांगड्या सौभाग्य अलंकार तेथे अर्पण करतात. फळांचा राजा आंबा हे तेथे वटवृक्षाची पूजा करताना ठेवतात. तसेच दूध साखरेचा नैवेदही दाखवतात त्यानंतर वडाच्या झाडाला सफेद दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालतात आणि शेवटी त्या धाग्याची वडाच्या खोडाला गाठ मारतात वटपौर्णिमा सण वृक्षांचे जतन संगोपन करण्याचा सामाजिक संदेश देखील देतो
