ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाल्याने शेवगाव येथे जल्लोष

शेवगाव-ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळाल्याने शेवगाव येथील मुंडे चौकात भाजपा ओबीसी युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा केला.
ओबीसी समाजाला २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याचे जाहीर झाल्यावर स्वागत करत गुरुवारी सकाळी ११ वाजता गोपीनाथ मुंडे साहेब चौक शेवगाव येथे ढोल ताशा व फटाके फोडून मिठाई वाटप करून जल्लोषात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले
भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो,भाजपा ओबीसी युवा मोर्चा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजि फडणवीस साहेब,योगेश आण्णा टिळेकर यांचा विजय असो अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे पदाधिकारी यांनी एकमेकांना मिठाई भरवुन आनंद उत्सव साजरा केला यावेळी भाजपा ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक गाढे,भाजपा प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ भाऊ माळवदे, भाजपा ओबीसी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी दहिफळे,अंकुश भाऊ ढाकणे, भाजपा जिल्हा चिटणीस किरण पाथरकर, भाजपा ओबीसी युवा मोर्चा तालुकाउपाध्यक्ष बाबासाहेब नाईक,अशोक भंडारे,भाजपा युवा नेते विष्णु नेमाने,भाजपा जिल्हा सचिव काकासाहेब ढाकणे,रामदास दहिफळे,विशाल वायभासे आदी मान्यवर उपस्थित होते.
