अहमदनगर

अकोले पंचायत समिती व माय मराठी अध्यापक संघ विद्यमाने मराठी शिक्षक कार्यशाळा संपन्न.


अकोले/प्रतिनिधी

पंचायत समिती शिक्षण विभाग, अकोले व माय मराठी अध्यापक संघ, अकोले यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी विषय शिक्षक कार्यशाळेचे आयोजन मॉडर्न हायस्कूल,अकोले येथे करण्यात आले होते.

सदर कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,संगमनेर या संस्थेचे प्राचार्य अरुण भांगरे यांनी माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक गुणवत्ता संपादणूक या विषयावर अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी करून आपले विचार व्यक्त केले.डाएटचे अधिव्याख्याता गणेश मोरे यांनीही मराठी विषय शिक्षक कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

दुसरे व्याख्यान महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समिती-2012 मराठी विषय समिती सदस्य,शिक्षण अभ्यासक भाऊसाहेब चासकर यांनी मराठी विषय समजून उमजून शिकविताना या विषयावर मराठी शिक्षकांशी संवाद साधताना विविध उदाहरणांच्या माध्यमातून शिक्षकांना प्रेरित करण्याचे काम केले.

या वेळी कार्यशाळेसाठीच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान पंचायत समितीचे शिक्षणविस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे यांनी भूषविले.

या प्रसंगी मॉडर्न हायस्कूलच्या प्राचार्य मुंदडा मॅडम, उपप्राचार्य दीपक जोंधळे,पर्यवेक्षक सुधीर जोशी,माजी मुख्याध्यापक बी.के.बनकर,लेखक राजेंद्र भाग्यवंत उपस्थित होते.दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरु करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक पाचपुते यांनी केले.आभार प्रदर्शन प्राचार्य मुंदडा मॅडम यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश गायकर यांनी केले.

कार्यशाळा संपल्यानंतर माय मराठी अध्यापक संघ,अकोलेची कार्यकारीणी सर्वानुमते निवडण्यात आली.सर्व नवीन शिक्षकांना कार्यकारीणीमध्ये स्थान देण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग,माय मराठी अध्यापक संघ, मॉडर्न हायस्कूलचा सर्व परिवार, मराठी विषयाचे तालुक्यातील सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.माय मराठी अध्यापक संघ,अकोले सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये नवीन कार्यकारीणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तीन वर्षासाठी नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली ती पुढीलप्रमाणे –
अध्यक्ष-संजय मधुकर पवार(अगस्ति विद्यालय,अकोले),
कार्याध्यक्ष- राजेंद्र भाऊ भोर(माध्यमिक विद्यालय,कोंभाळणे),उपाध्यक्ष-प्रा.संतराम रघुनाथ बारवकर(सर्वोदय विद्या मंदिर,राजूर),प्रा.डॉ.रंजना कदम(अकोले महाविद्यालय,अकोले),मंगल सरोदे मॅडम
(रत्नागिरी माध्य. विद्यालय,गर्दणी),
सचिव-सुनील जगन्नाथ साठे(अढळा विघालय,देवठाण),
सहसचिव-भांगरे गंगाधर पंढरीनाथ(शासकीय आश्रमशाळा,पळसुंदे),
गायकर रुपेश गोरख(मॉडर्न हायस्कूल,अकोले ),
जिल्हा संघटक-सुर्यवंशी मुकुंद रामराव(आदर्श विद्यालय,भंडारदरा कॅम्प),
गाडेकर अरुणा रामभाऊ (मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कुल अकोले),
खजिनदार-टकले दगडू नामदेव(श्री समर्थ माध्यमिक विद्यालय,मवेशी ),
सल्लागार/ विश्वस्त- पाचपुते दीपक माधव(सर्वोदय विद्या मंदिर,राजूर ),
साबळे भाऊसाहेब राजाराम
( अंबिका विद्यालय, टाहाकारी ),
पवार राम विष्ण (मधुकरराव पिचड विद्यालय,राजूर ),
गभाले युवराज विठ्ठल (डॉ. राजेंद्रप्रसाद आश्रमशाळा, शेणित),
विद्या समिती अध्यक्ष-बांबळे रामदास भगिरथ(माध्य. आश्रमशाळा, खडकी ),
विद्या समिती सचिव-
साबळे राजेविनोद दत्तात्रय
(सर्वोदय विद्या मंदिर,राजूर ),
विद्या समिती सहसचिव-
कांगणे तुकाराम रामभाऊ
(माध्यमिक विद्यालय,शेलद ),
कार्यकारीणी सदस्य- जाधव नवनाथ लहान ( जयभवानी माध्य. विद्या. केळुंगण),कोटकर संदीप भास्कर
(माध्य.आश्रमशाळा, खडकी),
जाधव प्रशांत(अगस्ती विद्यालय, अकोले),
पवार ज्योती यादवराव
(अनुदानित आश्रमशाळा, शेंडी ),
पिचड योगिता हरी
(शासकीय आश्रमशाळा,पिंपरकणे),सदगीर दिलीप तुकाराम (शासकीय आश्रमशाळा, केळी रुम्हणवाडी), रोहोम अनिल फ्रान्सिस(न्यू माध्य. विद्यालय,गुहिरे),
अशा प्रकारची नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button