सर्वोदय विदया मंदिर राजूर येथे संविधान दिन साजरा.

.
अकोले/प्रतिनिधी–
राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणुन काम करून आपल्याला हक्क बहाल करत असेल तर,त्यात दिलेली मुलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात.संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत.असे विचार प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी व्यक्त केले.
राजूर येथील गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात जागतिक संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी विदयालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी विभागप्रमुख धनंजय पगारे, दिपक पाचपुते,अधिक्षक मच्छिंद्र ढगे, अधिक्षीका श्रद्धा जोशी,रोहिणी सानप,दिपक बुऱ्हाडे,रविंद्र मढवई,सुधिर आहेर,विनोद तारू,महेश दिंडे,संजय वालझाडे,मंगळा देशमुख आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.बनकर यांनी पुढे मार्गदर्शन करताना जात,धर्म,भाषा,प्रांत,पक्ष या सर्वांच्या पलीकडे जाऊन आपण सगळे भारतीय समता, स्वातंत्र्य,बंधुता,न्याय,सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची जपवणूक करून भारताचे ऐक्य व अखंडता कायम ठेवू.अशी प्रतिज्ञा करू हेच भारतीय राज्यघटनेला अभिवादन ठरेल.असे प्रतिपादन केले.
धनंजय पगारे यांनी भारतीय राज्यघटना ही जागातील आदर्श घटना मानली जाते.सामाजिक,राजकीय,आर्थिक,
सांस्कृतीक इतिहास ध्यानात घेतला तर भारतीय राज्यघटना सामाजीक क्रांती म्हणावी लागेल.संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिले आहेत. ज्यामुळे आपण संपूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगतो.त्यामुळे नागरीकांसाठी अभिमानाचा दिवस असल्याचे विचार व्यक्त केले.
दिपक पाचपुते यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय त्यागातुन प्रत्येक नागरीकाला अधिकार प्राप्त झाले.संविधानाने दिलेले स्वातंत्र,समता,न्याय,बंधुता यामुळे आपल्या देशाबरोबरच इतर देशांना देखिल प्रेरणा मिळाली. त्यामुळे संविधानाप्रमाणे राज्यकारभार सुरू झाला असल्याचे विचार व्यक्त केले.
अधिक्षक मच्छिंद्र ढगे यांनी शिका,संघटित व्हा याप्रमाणे वाईटाचा त्याग करा.चांगल्याचा स्विकार करा.आर्थिक विषमतेची खोल दरी कमी करूनच राज्यघटनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल.देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने संविधानाचा उद्देश तर पुर्ण होईलच शिवाय संविधान निर्मात्यांच्या स्वप्नातील राष्ट्रही घडेल असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आर्पण करण्यात आला.सामुदायिक संविधानाचे वाचन करण्यात आले.विदयार्थी गोरक्ष लहामटे याने संविधानाचे वाचन केले.
प्रा.सचिन लगड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार मानले.
