हंगे विद्यालयात आ.लंके यांच्या हस्ते नवागतांचे स्वागत व गुणवंतांचा गौरव !

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल हंगे विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या पहिल्याच दिवशी पारनेर तालुक्याचे आमदार व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या उपस्थितीत इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत,इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण तसेच इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
प्रथमतः इयत्ता पाचवीतील नवीन विद्यार्थ्यांचे गावातून ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढून आगळे वेगळे स्वागत करण्यात आले.हंगे विद्यालयाचा इयत्ता दहावीचा सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला तर मराठी माध्यमाचा निकाल ८८.१३ टक्के लागला दळवी ऋषिकेश बाळासाहेब 94.80% गुण मिळवून प्रथम, खामकर आरती बाळासाहेब 89.60% गुण मिळवून द्वितीय, चौरे प्रणव गोपीनाथ 87.80% गुण मिळवून तृतीय आला.याप्रसंगी 80% च्या पुढे गुण मिळवलेल्या एकूण दहा विद्यार्थ्यांचा आमदार लंके व सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये गुणगौरव करण्यात आला.पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले.विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लापशी सांबर भात अशी सुरुची भोजनाची सोय करण्यात आली.आमदार निलेश लंके साहेब,सरपंच श्री राजेंद्र शिंदे, स्कूल कमिटी सदस्य श्री मनोहर दळवी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी हंगे गावचे सरपंच राजेंद्र शिंदे,उपसरपंच सुरेश रासकर,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दळवी,बाळासाहेब शिंदे,बाळासाहेब दळवी, जगदीप साठे,गणेश साळवे व सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन आबासाहेब दळवी,व्हाईस चेअरमन भाऊसाहेब रासकर,भाऊसाहेब साठे व सर्व सदस्य,पारनेर स्कूल कमिटीचे सदस्य पोपटराव इथापे,मनोहर दळवी सर,बाबासाहेब नवले,ज्ञानदेव लंके गुरुजी,प.स.सोंडकर गुरुजी,नेवासा येथून आलेले कापसे सरपंच व शेळके सरपंच,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील ठुबे व सर्व सेवक वृंद,तसेच शिक्षण प्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप शिंदे सर यांनी केले तर रोहिदास भालेराव सर यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ शोभा भालेराव मॅडम,राजेंद्र टापरे,अनिल खांदवे,सुदर्शन धस,रमेश दरेकर,रोहिदास भालेराव,भारती म्हस्के,सुवर्णा भोर,जयश्री क्षीरसागर,राजश्री धात्रक,जयसिंग खोडदे,रावसाहेब पायमोडे यांचे सहकार्य लाभले.