गुंफा येथील मंदिर सुशोभिकरणास डॉ. सोमाणी यांची आर्थिक मदत!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – नेवासा राजमार्गावरील श्री क्षेत्र गुंफा येथील श्री काळेश्वर देवस्थानच्या मंदिरकमान व पायऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी मंदिर समितीचे ट्रस्टी डॉ. हरीकिसन सोमाणी व डॉ. मंगल सोमाणी यांच्या वैयक्तीक खर्चातुन सव्वा लाख रुपये खर्च करून उर्वरित काम पुर्ण करण्याचा मानस व्यक्त करुन ते काम पुर्ण केले आहे.
काळेश्वर मंदिर उभारणी पासुन ते आजपर्यत देवस्थानचे ट्रस्टी असलेले डॉ. सोमाणी यांनी मंदिर कामात विशेष सहयोग दिले आहेत. जायकवाडी प्रकल्पाने आनेक गावे विस्थापित झाले. त्यातील काळेगावचाहि समावेश होतो. त्याच ठिकाणी असणाऱ्या स्वंयभू काळेश्वर भगवानाचे फार प्राचीन मंदिर होते. त्याच मंदिरातील त्याच देवस्थानची शेवगाव- नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाट्यापासुन अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्यां गुंफा या ठिकाणी स्थापना करण्यात आली. वर्षातुन दोन उत्सव या ठिकाणी भरतात. महाशिवरात्रीला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करुन महाभिषेक करण्यात येतो. तर श्रावण महिन्यातील तीसऱ्या सोमवारी या ठिकाणी यात्रा भरते. यासाठी जिल्हयासह इतर ठिकाणाहुन लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.मंदिर परिसराच्या विकासमध्ये भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर व डॉ. दिनेश राठी विविध कामे होण्यासाठी आग्रही आसतात. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले यांच्या विकास निधी मधुन भव्य दिव्य अशा सभाग्रहाची उभारणी झाली आहे. होत असलेल्या परिसर विकास मुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
श्री काळेश्वर देवस्थानच्या नयनरम्य परिसरामुळे व प्रशस्त अशा सभागृहामूळे या परिसरात अनेकविध कार्यक्रम होत आहेत. या परिसरात लवकरच एक भव्यदिव्य असे भक्तनिवास उभा राहणार असूनही तेही या वैभावात भर घालणार आहे. यापुर्वी एक भक्तनिवास लोकवर्गणीतुन उभे राहिले आहे. या परिसरात वृक्ष लागवडही करण्यात आली आहे.