नेहरु युवा केंद्राने लोणी हवेलीत घेतले व्यसन मुक्ती शिबीर

दत्ता ठुबे
पारनेर –
समाजातील व्यसनाधिनतेचे प्रमाण कमी करण्याचा भाग म्हणून नगर येथील नेहरू युवा केंद्राने पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथे घेतलेले व्यसन मुक्ती शिबीर अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
यावेळी प्रसिद्ध व्याख्याते दत्तात्रय बोरूडे व सागर हिंगडे यांनी सध्या समाजात सर्वत्र तरुणांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत व्यसनांचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढल्याने तंटे- बखेडे,संसारात कलह,पैशांची बरबादी,शारीरिक नुकसान होत असून या पासून मोठे नुकसान होत आहे.व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम युवकांना उदाहरणांसह दाखवून व पटवून दिल्याने उपस्थित युवकांनी व्यसन न करण्याची शपथ घेतली.यासाठी नगर येथील नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथे व्यसनमुक्ती जनजागृती शिबीर मोठ्या उत्साहात घेण्यात आले.या शिबीराला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबीराला प्रमोद कोल्हे,निलेश बोरूडे,निलेश जगताप,अशोक केकडे,अक्षय गव्हाणे , दत्तात्रय मोरे तसेच युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.