शनियात्रेत तीन लाखाहुन अधिक भाविकांचे शनिदर्शन !

विजय खंडागळे,
सोनई -प्रतिनिधी
– शनी शिंगणापूर येथे जून महिन्यातील सलग शनिवार, रविवार सुट्टी असूनही शनिअमावश्या कमी भरली, दरम्यान तीन लाखाहुन अधिक भाविकानी शनिदर्शन घेतल
यावेळी पंढरपुर यात्रा, उन्हाची तीव्रता, व शाळेची संपलेली सुट्टी या कारणमुळे कमी भरल्याचे जाणवले.
दर्शन रांगेत देशविदेशतून भाविक यांनी शनिदर्शनसाठी रागा होत्या.
.राहुरी –शनिशिंगनापुर रस्ता दुतर्फी चालू होता. दिवसभर शनी भक्त शनी देवाच्या चरणी लीन झाले. या वेळी देवस्थान समितीच्या वतीने येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते.
शेवगावचे अप्पर पोलिस अधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनख़ाली स.पो.नी. रामचंद्र करपे व स पो नी. माणिक चौधरी यांनी व जिल्ह्यातुन चोख बंदोबस्त ठेवला होता.
शनिदेवाला व शनिचौथारा विविध फुलानी सजावले होते. याप्रसंगी शनि भक्तां सह विविध मान्यवर शनिदर्शन घेण्यासाठी दाखल होत होते . पुरोहित अभिषेक वेदमंत्र देऊन शनिदर्शन देत होते . दर्शन रांगेत शनिदेवाचा जय जय कार केला जात होता.प्रवेश द्वारासह आकर्षक अशी मंदिर परिसरात विद्युत रोशणाई करण्यात आली होती.
विशेष अतिथी चे स्वागत अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर,सरचीटणीस आप्पासाहेब शेटे,सरपंच बाळासाहेब बानकर,पोलिस पाटील वकील सयाराम बानकर, यांच्यासह देवस्थाचे विश्वस्त हे करत होते.
शनिभक्ताना मनस्ताप
यावेळी शनिआमावश्य यात्रा कमी भरल्याचे जाणवले,देवस्थानकड़े येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची पार्किंग नियोजन 2/3 किलोमीटर वर केल्याने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकाना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मुळा कारखाना, कांगोणी, संभाजीनगर, हनुमानवाड़ी, घोड़ेगाव रोड, पानसनाला, आदी मार्गवर भाविकाच्या वाहनाची पार्किंग व्यवस्था केली होती.
पहाटेची आरती शनिभक्त माजी खा.चंद्रकांत खैरे व दुपारची आरती झिम्बाओंबेचे उद्योगपति शनिभक्त जयेश शहा व मुख्यआयकर विभागाचे आयुक्त कर्नासाहेब, सायंकाळ ची आरती पुणे येथील डेंटल विद्यालयाचे सदस्य हेडगेवार यांच्या हस्ते झाली.
माजी मंत्री, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले यांनी राज्यातील शेतकरयासाठी वरुणराजा कड़े धो धो पाऊस पडून पेरणी व्हावी, अशी प्रार्थना करुन शनिचरणी साकडे घातले
दिवसभरात महिपाती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, पद्मश्री पोपट पवार, राज्याचे उद्योग सचिव प्रजाकता लवंगारे,बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा, रामभाऊ जगताप,दिपक पटारे,बाबासाहेब भोगे, भाऊराव कुर्हे, मराठा महासघचे संभाजी दहातोंडे ,आदी उपस्थित होते.
महसूल विभागाची पहिल्यांदा एंट्री
पहिल्यांदाच महसूल विभागाचे प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार बिराजदार यांनी दोन नायब तहसीलदार, चार तलाठी, व दोन सर्कल मैनदलधिकारी यांची यात्रेवर नियत्रण ठेवणायासाठी नियुक्ति करण्यात आली होती.
आरोग्य विभागाचे डॉ, राजेंद्र कसबे व डॉ. विधाटे यांनी भाविकांची आरोग्य तपसणी करीता सेवा दिली.